बहुप्रतिक्षित टोकियो ऑलिम्पिक २०२० स्पर्धेचे बिगुल वाजायला आता सुरूवात झाली आहे. गेल्या वर्षी होणाऱ्या या स्पर्धेला करोनाने ब्रेक लावला. आता ही स्पर्धा २३ जुलैपासून सुरू होणार आहे. भारताचे खेळाडूही या स्पर्धेसाठी सज्ज झाले आहेत. अधिकाधिक पदक मिळवण्यासाठी भारताचे खेळाडू कसून सराव करत आहेत. या स्पर्धेत भारताकडून तब्बल शंभरहून अधिक खेळाडू सहभागी झाले आहेत.
पी. व्ही. सिंधू, विनेश फोगाट, बजरंग पुनिया, दीपिका कुमारी, मेरी कोम, विकास कृष्णा, मीराबाई चानू, यांसारख्या खेळांडूकडून भारताला सुवर्णपदकाची आशा आहे. तसेच हॉकी टीमकडूनही भारतीयांना पदाकाची आस आहे.
तिरंदाजी
दीपिका कुमारी, तरूणदीप रॉय, अतानु दास, प्रवीण जाधव हे खेळाडू तिरंदाजी क्रीडा प्रकारात सहभागी होणार आहेत. त्यामुळे या खेळात भारताला पदके मिळण्याची दाट शक्यता आहे.
अॅथलिट्स
या क्रीडाप्रकारात भारताची कामगिरी तशी चांगली झालेली नाही. परंतु, भालाफेक मध्ये नीरज चोप्रा आणि शिवपाल सिंग यांनी भारताच्या आशा पल्लवित केल्या आहेत. या खेळात सहभागी झालेले खेळाडू.
- केटी इरफान (२० किलोमीटर रेस वॉक)
- संदीप कुमार (२० किलोमीटर रेस वॉक)
- राहुल रोहिला (२० किलोमीटर रेस वॉक)
- गुरप्रीत सिंह (२० किलोमीटर रेस वॉक)
- भावना (२० किलोमीटर रेस वॉक)
- प्रियंका गोस्वामी (२० किलोमीटर रेस वॉक)
- अविनाश साबळे (३०० मीटर स्टीपल चेस)
- मुरली श्रीशंकर (उंच उडी)
- एमपी जयबीर (४०० मीटर हर्डल रेस)
- नीरज चोप्रा (भालाफेक)
- शिवपाल सिंग (भालाफेक)
- अनु रानी (भालाफेक)
- ताजिंदरपाल सिंग (गोळाफेक)
- द्युती चंद (१०० मीटर आणि २०० मीटर रेस इवेंट)
- कमलप्रीत कौर (डिस्क थ्रो)
- सीमा पुनिया (डिस्क थ्रो)
बॅटमिंटन
पी.व्ही.सिंधूने रिओ ऑलिम्पिकमध्ये रौप्यपदक मिळवले होते. या वर्षी तिच्याकडून सुवर्णपदकाची अपेक्षा आहे. बॅटमिंटनमध्ये सहभागी झालेले खेळाडू…
- पी. व्ही. सिंधू (बॅटमिंटन)
- बी. साईप्रणित (बॅटमिंटन)
- सिक्की रेड्डी और चिराग शेट्टी (बॅटमिंटन दुहेरी)
हेही वाचा – IND vs ENG : “चला भावांनो, सुट्ट्या संपल्या”, मैदानावर परतले टीम इंडियाचे खेळाडू
बॉक्सिंग
- मेरी कोम (५१ किलोग्राम)
- विकास कृष्णा (६९ किलोग्राम)
- लवलीना (६९ किलोग्राम)
- आशिष कुमार (७५ किलोग्राम)
- पूजा रानी (७५ किलोग्राम)
- सतीश कुमार (९१ किलोग्राम)
- अमित पांघल (५२ किलोग्राम)
- मनीष कौशिक (६३ किलोग्राम)
- सिमरनजीत कौर (६० किलोग्राम)
फेन्सिंग
ऑलिम्पिकमधील फेन्सिंग स्पर्धेत भारत प्रथमच सहभागी होणार आहे. भवानी देवी ही या स्पर्धेत भाग घेणारी पहिली भारतीय ठरणार आहे.
गोल्फ
टोकियो ऑलिम्पिक २०२०मध्ये भारताने गोल्फमध्ये चांगली कामगिरी करावी अशी अपेक्षा आहे. पुरुष आणि महिला अशा दोन्ही गटात भारत गोल्फमध्ये भाग घेईल.
- अनिर्बन लाहिरी
- उदयन माने
- अदिती अशोक
जिम्नॅस्टिक
प्रणती नायक ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरलेली भारताची दुसरी जिम्नॅस्ट आहे.
हॉकी
भारताच्या पुरुष आणि महिला या दोन्ही हॉकी संघांनी यावेळी ऑलिम्पिकमध्ये प्रवेश मिळविला आहे.
ज्युडो
ज्युडोमध्ये भाग घेणारी भारतातील सुशीला देवी ही एकमेव खेळाडू आहे. सुशीला देवीने ४८ किलो गटात स्थान मिळवले.
रोइंग
अर्जुन आणि अरविंदसिंग हे भारतासाठी पात्र ठरविण्यात यशस्वी ठरले आहेत.
शूटिंग
यंदाच्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी १५ भारतीय नेमबाज पात्र ठरले. ऑलिम्पिक स्पर्धेच्या कोणत्याही प्रकारात स्थान मिळविण्याची ही भारतातील सर्वात मोठी तुकडी आहे.
- अंजुम मोदगिल (१० मी)
- अपूर्व चंडेला (१० मी)
- दिव्यांश सिंह (१० मी)
- दीपक कुमार (१० मी)
- तेजस्वीनी सावंत (१० मी)
- संजीव राजपूत (१० मी)
- ऐश्वर्या प्रताप (५० मी)
- मनु भाकर (१० मी)
- यशस्विनी सिंग (१० मी)
- सौरव चौधरी (१० मी)
- अभिषेक वर्मा (१० मी)
- राही सरनोबत (२५ मीटर)
- चिंकी यादव (२५ मी)
- अंगद वीरसिंह (Skeet)
- मीरज सिंग (Skeet)
स्विमिंग
साजन प्रकाश हा जलतरण स्पर्धेत भाग घेणारा भारताचा पहिला खेळाडू ठरणाल आहे. साजन कुमारने २०० मीटर बटरफ्लाय स्पर्धेसाठी पात्रता दर्शविली आहे.
टेबल टेनिस
चार खेळाडू टेबल टेनिसमध्ये भारताकडून पात्र ठरले आहेत. शरथ कमल आणि मनिका बत्रा यांच्याकडून पदकाची भारताला आशा आहे.
- शरथ कमल
- साथियान
- सुतीर्थ मुखर्जी
- मनिका बत्रा
वेटलिफ्टिंग
टोकियो ऑलिम्पिकच्या वेटलिफ्टिंग स्पर्धेत भाग घेणारी मीराबाई चानू ही भारतातील एकमेव खेळाडू आहे. जागतिक क्रमवारीत मीराबाई चानू दुसर्या क्रमांकावर असून तिला सुवर्णपदकासाठी दावेदार मानले जात आहे.
कुस्ती
टोकियो ऑलिम्पिकच्या कुस्ती स्पर्धेत भारताकडून सात खेळाडू सहभागी होतील. मात्र, रिओ ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक जिंकणार्या साक्षी मलिकला टोकियो ऑलिम्पिकमध्ये भाग घेता येणार नाही.