ग्लासगो येथे सुरू असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरूष हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीतील विजयामुळे हॉकीमध्ये भारताचे पदक निश्चित झाले आहे. भारताने उपांत्य फेरीत न्युझीलंडच्या संघाचा ३-२ असा पराभव करत अंतिम फेरी गाठली आहे. जागतिक क्रमवारीत सहाव्या स्थानावर असणाऱ्या न्युझीलंड संघामध्ये अनेक अनुभवी खेळाडूंचा भरणा होता. सामन्याच्या सुरूवातीला सायमन चाईल्ड आणि निक हेग यांनी गोल करत न्युझीलंडला २-० अशी आघाडी मिळवून दिली होती. मात्र, त्यामुळे खचून न जाता भारतीय संघाच्या आकाशदीप सिंग, रमदनदीप सिंग आणि रुपिंदर पाल यांनी प्रत्येकी एक गोल करत अंतिम फेरीत भारताचे स्थान निश्चित केले. अंतिम फेरीत भारताला ऑस्ट्रेलियन संघाच्या खडतर आव्हानाला सामोरे जावे लागणार आहे . त्यामुळे ऑस्ट्रेलियावर मात करून भारतीय हॉकी संघ सुवर्णपदकावर नाव कोरणार का, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिली आहे.
संग्रहित लेख, दिनांक 2nd Aug 2014 रोजी प्रकाशित
राष्ट्रकुल स्पर्धा: भारतीय हॉकी संघ अंतिम फेरीत दाखल
ग्लासगो येथे सुरू असणाऱ्या राष्ट्रकुल स्पर्धेत भारताच्या पुरूष हॉकी संघाने अंतिम फेरीत धडक मारली आहे. उपांत्य फेरीतील विजयामुळे हॉकीमध्ये भारताचे पदक निश्चित झाले आहे.

First published on: 02-08-2014 at 06:58 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India set up hockey final with australia after edging nz 3 2 in semis