ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताने ३ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली आणि १६६ धावांची आघाडी घेतली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 

ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३२५ धावांवर आटोपल्यानंतर भारताकडून सलामीवीरांनी ६३ धावांची सुरुवात मिळवून दिली. मुरली विजय १८ तर लोकेश राहुल ४४ धावांवर बाद झाला. हे दोघे बाद झाल्यावर कोहली पुजाराने डाव सावरला.

 

कोहली ३४ धावांवर बाद झाला. मात्र पुजारा ४० धावांवर नाबाद आहे. स्टार्क, हेजलवूड आणि लॉयन यांनी १-१ बळी टिपला.

त्याआधी, दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस ऑस्ट्रेलियाची धावसंख्या ही ७ बाद १९१ अशी होती. तिसऱ्या दिवसाच्या खेळात पावसाने दोन वेळा व्यत्यय आणल्यामुळे सामना सुरु होण्यासाठी विलंब झाला. या दरम्यान ऑस्ट्रेलियाचे फलंदाज आपल्या धावसंख्येत ४४ धावांची भर घालू शकले.  ट्रेव्हिस हेडने अर्धशतकी (७२) खेळी करुन संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला. मात्र त्याचे प्रयत्नही अपुरे पडले. मोहम्मद शमीने ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजांना माघारी धाडत भारताला पहिल्या डावात १५ धावांची आघाडीवर घेतली. रविचंद्रन अश्विन आणि जसप्रीत बुमराहने ३-३, तर इशांत शर्मा आणि मोहम्मद शमीने २-२ बळी टिपले.

Live Blog

Highlights

  • 13:59 (IST)

    तिसरा दिवस भारताचा! दिवसअखेर १६६ धावांची आघाडी

    ?????????????????????? ??????? ?????? ??????? ???????? ??????? ? ??? ??? ??????????? ??? ????? ??? ??? ??????? ????? ?????. ?????? ?? ??????? ????? ???. ???????, ??????? ??? ???? ????? ?-? ??? ?????.

  • 10:46 (IST)

    ऑस्ट्रेलियाचा डाव २३५ धावांवर संपला; भारताला १५ धावांची आघाडी

    ??????? ????? ???? ????? ??????? ??? ??????? ??????????????? ???????? ????????? ?????? ????, ????????????? ??? ??? ??????? ??????.??????? ????? ??????? ?? ??????? ?????

13:59 (IST)08 Dec 2018
तिसरा दिवस भारताचा! दिवसअखेर १६६ धावांची आघाडी

ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या कसोटीत तिसऱ्या दिवसअखेर भारताने ३ बाद १५१ धावांपर्यंत मजल मारली आणि १६६ धावांची आघाडी घेतली. पुजारा ४० धावांवर नाबाद आहे. स्टार्क, हेजलवूड आणि लॉयन यांनी १-१ बळी टिपला.

13:41 (IST)08 Dec 2018
कर्णधार कोहली माघारी; भारताला तिसरा धक्का

खेळपट्टीवर स्थिरावलेला कर्णधार विराट कोहली ३४ धावांवर माघारी परतला. लायनच्या गोलंदाजीवर भारताला तिसरा धक्का बसला आणि फिंचने कोहलीचा झेल पकडला.

13:17 (IST)08 Dec 2018
कोहली-पुजाराने सावरले; भारताकडे दीडशतकी आघाडी

पहिल्या डावात अपयशी ठरल्यानंतर दुसऱ्या डावात भारतीय फलंदाज चांगली फलंदाजी करत आहेत. ६३ डावांची चांगली सलामी मिळाल्यानंतर आता पुजारा - कोहली ही जोडी मैदानावर आहे आणि भारताकडे दीडशतकी आघाडी झाली आहे.

11:11 (IST)08 Dec 2018
४४ धावांवर राहुल झेलबाद, भारताला दुसरा धक्का

चांगली सुरुवात मिळाल्यानंतर ४४ धावांवर राहुल झेलबाद झाला. जोश हेजलवूडने टाकलेल्या चेंडूला त्याने बॅट लावली आणि झेल गेला. यामुळे भारताला दुसरा धक्का बसला.

10:48 (IST)08 Dec 2018
भारताला पहिला धक्का, मुरली विजय माघारी

मिचेल स्टार्कने मुरली विजयला माघारी धाडत भारताला पहिला धक्का दिला, दुसऱ्या डावात भारताला पहिला धक्का

10:46 (IST)08 Dec 2018
दुसऱ्या डावात भारताची आश्वासक सुरुवात

पहिल्या विकेटसाठी मुरली विजय आणि लोकेश राहुल यांनी अर्धशतकी भागीदारी रचत भारताची आघाडी आश्वासक पद्धतीने वाढवली

10:46 (IST)08 Dec 2018
ऑस्ट्रेलियाचा डाव २३५ धावांवर संपला; भारताला १५ धावांची आघाडी

मोहम्मद शमीने एकाच षटकात लागोपाठ दोन चेंडूवर ऑस्ट्रेलियाच्या तळातल्या फलंदाजाना माघारी धाडत, ऑस्ट्रेलियाचा डाव २३५ धावांवर संपवला.पहिल्या डावात भारताला १५ धावांची आघाडी

07:32 (IST)08 Dec 2018
पाऊस थांबला, सामन्याला पुन्हा सुरुवात

भारताला आघाडी घेण्यासाठी अवघ्या २ विकेटची गरज

06:42 (IST)08 Dec 2018
ऑस्ट्रेलियाला आठवा धक्का, सामन्यात पुन्हा एकदा पावसाचा व्यत्यय

जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर स्टार्क पंतकडे झेल देऊन माघारी परतला. मात्र पावसाच्या आगमनामुळे पंचांना पुन्हा एकदा सामना थांबवावा लागला.

06:29 (IST)08 Dec 2018
पाऊस थांबला, खेळपट्टीवरील ओल काढल्यानंतर सामन्याला सुरुवात

भारताला पहिल्या डावात आघाडी घेण्यासाठी ३ विकेटची गरज

06:28 (IST)08 Dec 2018
अॅडलेडच्या मैदानावर पाऊस पडल्यामुळे सामना सुरु होण्यास अर्धा ते पाऊण तास उशीर
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of australia 2018 1st test day 3 live updates
First published on: 08-12-2018 at 06:23 IST