सलामीवीर रोहित शर्मा आणि विराट कोहलीने झळकावलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर भारताने तिसऱ्या वन-डे सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवला आहे. या विजयासोबत भारताने 5 वन-डे सामन्यांच्या मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे. न्यूझीलंडने दिलेलं 244 धावांचं आव्हान भारताने सहज पूर्ण केलं. विराट आणि रोहित यांनी दुसऱ्या विकेटसाठी 113 धावांची भागीदारी रचत भारताच्या विजयाची पायाभरणी केली. रोहितने 62 तर कोहलीने 60 धावा केल्या. यानंतर अंबाती रायुडू आणि दिनेश कार्तिक या जोडीने भारतीय संघाच्या विजयावर शिक्कामोर्तब केलं.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

न्यूझीलंडच्या भूमीवर विजय मिळवण्यासाठी भारतीय संघाला तब्बल एका दशकाची वाट पहावी लागली. 2008-09 साली भारताने न्यूझीलंडमध्ये 3-1 च्या फरकाने वन-डे मालिका जिंकली होती. न्यूझीलंडकडून ट्रेंट बोल्टने 2 तर मिचेल सँटनरने 1 बळी घेतला.

अवश्य वाचा – भारतीय संघाला मोठा धक्का, अंबाती रायुडूवर निलंबनाची कारवाई

याआधी रॉस टेलर आणि टॉम लॅथम यांनी झळकावलेल्या अर्धशतकाच्या जोरावर यजमान न्यूझीलंडने तिसऱ्या वन-डे सामन्यात 49 षटकात 243  धावांपर्यंत मजल मारली. अनुभवी रॉस टेलरने 93 तर टॉम लॅथमने 51 धावांची खेळी केली. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेल्या न्यूझीलंडच्या संघाची सुरुवात चांगली झाली नाही. कॉलिन मुनरो आणि मार्टीन गप्टील हे सलामीवीर स्वस्तात माघारी परतले. यानंतर कर्णधार केन विल्यमसनने काहीकाळ संघाचा डाव सावरण्याचा प्रयत्न केला, मात्र तो ही चहलच्या गोलंदाजीवर झेलबाद होऊन माघारी परतला.

यानंतर रॉस टेलर आणि टॉम लॅथम जोडीने चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी रचली. दोन्ही फलंदाजांनी भारतीय गोलंदाजीचा समर्थपणे सामना करत धावफलक हलता ठेवला. दोघांमध्येही चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी झाल्यानंतर टॉम लॅथम माघारी परतला. यानंतर सावरलेला न्यूझीलंडचा संघ पुन्हा एकदा कोलमडला. एकामागोमाग एक फलंदाज माघारी परतल्यामुळे भारतीय संघाने सामन्यावर पुन्हा एकदा वर्चस्व मिळवलं. तळातल्या फळीतल्या फलंदाजांनी फटकेबाजी करत न्यूझीलंडला 243  धावांचं लक्ष्य गाठून दिलं. भारताकडून मोहम्मद शमीने 3 बळी घेतले, त्याला हार्दिक पांड्या, भुवनेश्वर कुमार आणि युजवेंद्र चहलने प्रत्येकी 2-2 आणि भुवनेश्वरने 1 बळी घेत चांगली साथ दिली.

Live Blog

Highlights

  • 11:00 (IST)

    रॉस टेलरला माघारी धाडण्यात शमीला यश, न्यूझीलंडला सातवा धक्का

    ????????????? ?????? ???? ???????? ??? ?????? ??? ?????, 93 ??????? ???? ?????????? ????? ?????????? ??? ???? ??????

  • 10:21 (IST)

    टेलरपाठोपाठ टॉम लॅथमचं अर्धशतक, मात्र चहलने दूर केला लॅथमचा अडसर

    ??? ?????? ??????? ?????? ?????? ??? ????????? ???????? ???? ?????, ????? ??????? ?????????? ???? ???? ??????????? ????? ????????? ??? ??? ???? ??????

    ??????????? ???? ?????

  • 08:43 (IST)

    न्यूझीलंडला तिसरा धक्का, कर्णधार विल्यमसन माघारी

    ????????? ??????? ?????????? ??????? ????????? ?????????? ????? ??? ?????

  • 08:05 (IST)

    भारतीय संघात दोन बदल, हार्दिक पांड्याला संघात स्थान

    ??????????? ???? ???????????? ?????????? ???? ????? ??????. ???????? ?????? ????? ??????? ?? ????????????? ???????? ????????.

    ??????? ?????? ?????? ????? ??????? ??????? ??????????? ????? ???????? ???? ???.

14:51 (IST)28 Jan 2019
विराट कोहली माघारी परतल्यानंतर रायुडू-दिनेश कार्तिक जोडीकडून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब

तिसऱ्या सामन्यात भारत 7 गडी राखून विजयी, मालिकेत 3-0 ने विजयी आघाडी

13:44 (IST)28 Jan 2019
भारताची जमलेली जोडी फुटली, रोहित शर्मा माघारी

मिचेल सँटनरच्या गोलंदाजीवर पुढे येऊन फटका खेळण्याच्या नादात रोहित शर्मा यष्टीचीत होऊन माघारी

13:40 (IST)28 Jan 2019
कर्णधार विराट कोहलीचंही अर्धशतक

भारतीय संघाची सामन्यावर पकड

13:18 (IST)28 Jan 2019
रोहित शर्माचं अर्धशतक, भारताची सामन्यावर पकड

शिखर धवन माघारी परतल्यानंतर रोहितने कर्णधार विराट कोहलीच्या साथीने भारतीय संघाचा डाव सावरला. रोहितचं दमदार अर्धशतक

12:22 (IST)28 Jan 2019
भारताला पहिला धक्का, शिखर धवन माघारी

ट्रेंट बोल्टच्या गोलंदाजीवर शिखर माघारी

11:20 (IST)28 Jan 2019
न्यूझीलंडचा अखेरचा फलंदाज ट्रेंट बोल्ट माघारी, भारताला विजयासाठी 244 धावांचं आव्हान

भुवनेश्वर कुमारने घेतला बळी, भारताला मालिकेत विजयी आघाडी घेण्याची संधी

11:15 (IST)28 Jan 2019
न्यूझीलंडला नववा धक्का, डग ब्रेसवेल धावबाद

विराट कोहलीच्या चपळ क्षेत्ररक्षणामुळे न्यूझीलंडचा आणखी एक फलंदाज माघारी

11:12 (IST)28 Jan 2019
इश सोढी माघारी, यजमानांचा आठवा फलंदाज बाद

शमीच्या गोलंदाजीवर कर्णधार विराटने पकडला झेल

11:00 (IST)28 Jan 2019
रॉस टेलरला माघारी धाडण्यात शमीला यश, न्यूझीलंडला सातवा धक्का

न्यूझीलंडच्या डावाला आकार देणाऱ्या रॉस टेलरचं शतक हुकलं, 93 धावांवर टेलर यष्टीरक्षक दिनेश कार्तिककडे झेल देऊन माघारी

10:41 (IST)28 Jan 2019
हेन्री निकोलस आणि मिचेल सँटनर ठराविक अंतराने माघारी, न्यूझीलंडचे 6 गडी बाद

पुनरागमन करणाऱ्या हार्दिक पांड्याने दमदार कामगिरी करत दोघा फलंदाजांना माघारी धाडलं आहे.

10:21 (IST)28 Jan 2019
टेलरपाठोपाठ टॉम लॅथमचं अर्धशतक, मात्र चहलने दूर केला लॅथमचा अडसर

टॉम लॅथमने अर्धशतक झळकावत संघाचा डाव सावरण्यात महत्वाचा वाटा उचलला, मात्र चहलच्या गोलंदाजीवर मोठा फटका खेळण्याच्या नादात रायुडूकडे झेल देत लॅथम माघारी

न्यूझीलंडला चौथा धक्का

09:53 (IST)28 Jan 2019
रॉस टेलरचं अर्धशतक, न्यूझीलंडचा डाव सावरला

टेलर आणि टॉम लॅथम जोडीने भागीदारी रचत भारतीय गोलंदाजांचा समर्थपणे सामना करत आपल्या संघाला आव्हानात्मक धावसंख्या गाढून दिली आहे. रॉस टेलरने आपलं अर्धशतक साजरं केलं आहे.

दोघांमध्ये चौथ्या विकेटसाठी शतकी भागीदारी

08:43 (IST)28 Jan 2019
न्यूझीलंडला तिसरा धक्का, कर्णधार विल्यमसन माघारी

युझवेंद्र चहलच्या गोलंदाजीवर हार्दिक पांड्याने विल्यमसनचा सुरेख झेल पकडला

08:42 (IST)28 Jan 2019
केन विल्यमसन आणि रॉस टेलर जोडीने यजमान संघाचा डाव सावरला

दोन्ही फलंदाजांनी आपल्या संघाला 50 धावांचा टप्पा ओलांडून दिली

08:06 (IST)28 Jan 2019
मार्टीन गप्टीलही माघारी, यजमानांचे दोन्ही सलामीवीर माघारी

भुवनेश्वर कुमारच्या गोलंदाजीवर दिनेश कार्तिकने घेतला गप्टीलचा झेल, न्यूझीलंडला दुसरा धक्का

08:06 (IST)28 Jan 2019
न्यूझीलंडची अडखळती सुरुवात, कॉलिन मुनरो माघारी

मोहम्मद शमीच्या गोलंदाजीवर रोहित शर्माने घेतला झेल

08:05 (IST)28 Jan 2019
भारतीय संघात दोन बदल, हार्दिक पांड्याला संघात स्थान

महेंद्रसिंह धोनी दुखापतग्रस्त असल्यामुळे खेळू शकणार नाहीये. त्याच्या जागेवर दिनेश कार्तिक आज यष्टीरक्षणाची जबाबदारी सांभाळेल.

याचसोबत बंदीची शिक्षा भोगून आलेल्या हार्दिक पांड्यानेही संघात पुनरागमन केलं आहे.

08:04 (IST)28 Jan 2019
न्यूझीलंडने नाणेफेक जिंकली, प्रथम फलंदाजीचा निर्णय

मालिकेत 0-2 ने पिछाडीवर असलेल्या यजमान न्यूझीलंडला आपलं आव्हान कायम राखण्यासाठी हा सामना अत्यंत महत्वाचा आहे

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India tour of new zealand 2019 3rd odi bay oval mount maunganui live updates
First published on: 28-01-2019 at 08:00 IST