India vs Australia 1st T20 Highlights, 23 November 2023 : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेला गुरुवारी (२३ नोव्हेंबर) सुरुवात झाली. उभय संघांमधील पहिला सामना विशाखापट्टणम येथील डॉ. वाय.एस. राजशेखर रेड्डी क्रिकेट स्टेडियमवर खेळला गेला. भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन विकेट गमावत २०८ धावा केल्या. प्रत्युतरात टीम इंडियाने १९.५ षटकांत आठ विकेट गमावत २०९ धावा करत सामना जिंकला. रिंकू सिंगने शेवटच्या चेंडूवर षटकार ठोकला, पण शॉन अॅबॉटचा चेंडू नो-बॉल होता. अशा स्थितीत रिंकूच्या खात्यात या सहा धावा जमा झाले नाहीत. त्याचबरोबर नो-बॉलची एक धाव मिळाल्याने टीम इंडिया विजय ठरली.
IND vs AUS T20 Highlights : ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या टी-२० सामन्यात कर्णधार सूर्यकुमार यादवच्या अर्धशतकानंतर रिंकू सिंगच्या स्फोटक खेळीच्या जोरावर भारतीय संघाने २ गडी राखून विजय मिळवला.
पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा दोन गडी राखून पराभव केला आहे. विशाखापट्टणमच्या डॉ. वाय.एस. राजशेखर स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात जोश इंग्लिसच्या झंझावाती शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने २० षटकात तीन गड्यांच्या मोबदल्यात २०८ धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात टीम इंडियाने सूर्यकुमार यादवच्या ८० आणि इशान किशन ५८ धावांच्या झंझावाती खेळीमुळे शेवटच्या षटकात लक्ष्याचा पाठलाग केला. मात्र, एक चेंडू शिल्लक असताना रिंकू सिंगने भारताला विजय मिळवून दिला. रिंकू १४ चेंडूत २२ धावा करून नाबाद परतला.
सूर्यकुमार यादव ४२ चेंडूत ८० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ९ चौकार आणि ४ षटकार मारले. १८ षटकांनंतर ५ विकेटवर १९५ धावा. रिंकू सिंग आणि अक्षर पटेल क्रीजवर आहेत. भारताला १२ चेंडूत १४ धावांची गरज आहे.
१६ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या ४ विकेटवर १७१ धावा आहे. भारताला विजयासाठी आता २४ चेंडूत ३८ धावा करायच्या आहेत. सूर्यकुमार यादव ३४ चेंडूत ६१ धावांवर खेळत आहे. आतापर्यंत त्याने ६ चौकार आणि ३ षटकार मारले आहेत. रिंकू सिंग पाच चेंडूत दोन चौकारांसह १० धावांवर खेळत आहे.
लेगस्पिनर तनवीर संगाला दुसरे यश मिळाले. त्याने १२ धावांवर तिलक वर्माला बाद केले. भारतीय संघाची धावसंख्या १५ षटकांनंतर ४ बाद १५५ धावा आहे. सूर्यकुमार यादव आणि रिंकू सिंग क्रीजवर आहेत. संघाला ३० चेंडूत ५४ धावांची गरज आहे.
सूर्यकुमार यादवने कर्णधार म्हणून पहिल्या टी-२० सामन्यात अर्धशतक झळकावले. त्याने २९व्या चेंडूवर शॉन अॅबॉटला षटकार ठोकत आपले अर्धशतक पूर्ण केले. १४ षटकांनंतर धावसंख्या ३ विकेटवर १४४ धावा. सूर्या ५५ आणि तिलक वर्मा ३ धावांवर खेळत आहेत.
https://twitter.com/CrickologyNews/status/1727728088497447070
यष्टिरक्षक फलंदाज इशान किशनने ३७ चेंडूत आपले अर्धशतक पूर्ण केले. त्याने तन्वीर संगका टाकायला आलेल्या १२व्या षटकाच्या पहिल्या दोन चेंडूंवर एक चौकार आणि एक षटकार ठोकला. मात्र तिसऱ्या चेंडूवर तो बाद झाला. इशशानने ३९ चेंडूत ५८ धावा केल्या. या दरम्यान त्याने २ चौकार आणि ५ षटकार मारले. १३ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या तीन गड्यांच्या मोबदल्यात १३५ धावा आहे.
भारतीय संघाने १० षटकांनंतर २ बाद १०६ धावा केल्या आहेत. सूर्यकुमार यादव २२ चेंडूत ४० धावांवर खेळत आहे, तर इशान किशने ३० चेंडूत एका षटकारासह ३९ धावांवर खेळत आहे. आता भारतीय संघाला ६० चेंडूत १०३ धावांची गरज आहे.
८ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ७९ धावा आहे. सूर्यकुमार यादव १९ चेंडूत ३७ धावांवर खेळत आहे. आतापर्यंत त्याने ४ चौकार आणि २ षटकार मारले आहेत. तर इशान किशन २१ चेंडूत एका षटकारासह १९ धावांवर खेळत आहे.
https://twitter.com/Crick_tainment/status/1727720110566281301
दोन विकेट पडल्यानंतरही टीम इंडियाने पॉवरप्लेचा चांगला वापर केला आहे. ६ षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ६३ धावा आहे. सूर्यकुमार यादव १२ चेंडूत २६ आणि इशान किशन १६ चेंडूत १४ धावांवर खेळत आहे.
सीन अॅबॉटने पाचवे षटक टाकले. या षटकात एकूण २० धावा आल्या. इशान किशनने अॅबॉटवर षटकार मारला आणि त्यानंतर सूर्यकुमारने एक षटकार आणि एक चौकार मारला. पाच षटकांनंतर टीम इंडियाची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात ५४धावा आहे.
ऑस्ट्रेलियन कर्णधार मॅथ्यू वेडने यशस्वी जैस्वालसमोर ऑफस्पिनर मॅथ्यू शॉर्टकडे चेंडू दिला. यशस्वी जैस्वालने पहिल्या चेंडूवर चौकार आणि नंतर षटकार ठोकला. मात्र, तिसऱ्या चेंडूवर तो झेलबाद झाला. यशस्वी जैस्वाल आठ चेंडूंत दोन चौकार आणि दोन षटकारांच्या मदतीने २१ धावा करून बाद झाला. तत्पूर्वी ऋतुराज गायकवाडला खातेही उघडता आले नाही,तीन षटकांनंतर भारताची धावसंख्या दोन गड्यांच्या मोबदल्यात २५ धावा आहे.
दुसरे षटक जेसन बेहरेनडॉर्फने टाकले. या षटकात एकही धाव आली नाही. जेसन बेहरेनडॉर्फने इशान किशनसमोर मेडन ओव्हर टाकले. दोन षटकांनंतर भारताची धावसंख्या एका विकेटवर केवळ १२ धावा होती.
https://twitter.com/TharunRakesh2/status/1727713927306576058
ऑस्ट्रेलियाने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना २० षटकांत ३ बाद २०८ धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाकडून जोश इंग्लिसने सर्वाधिक धावा केल्या. तो ५० चेंडूत ११० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि आठ षटकार मारले. याशिवाय स्टीव्ह स्मिथने ५२ धावा केल्या. शेवटी टीम डेव्हिड १३ चेंडूत १९ धावा काढून नाबाद परतला. भारताकडून रवी बिश्नोई आणि प्रसिध कृष्णा महागडे ठरले. दोघांनी ५० हून अधिक धावा दिल्या. तर मुकेश कुमारने शेवटच्या षटकात केवळ पाच धावा दिल्या.
जोश इंग्लिसने त्याच्या आंतरराष्ट्रीय टी-२० कारकिर्दीतील पहिले शतक झळकावले. त्याने १७व्या षटकात अर्शदीप सिंगच्या चौथ्या चेंडूवर चौकार मारून आपले शतक पूर्ण केले. यानंतर काही वेळातच इंग्लिश पॅव्हेलियनमध्ये परतले. १८व्या षटकाच्या दुसऱ्या चेंडूवर प्रसिध कृष्णाने त्याला पॅव्हेलियनमध्ये पाठवले. इंग्लिश ५० चेंडूत ११० धावा करून बाद झाला. त्याने आपल्या खेळीत ११ चौकार आणि आठ षटकार मारले. इंग्लिशने २२० च्या स्ट्राइक रेटने धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज जोश इंग्लिसने अवघ्या ४७ चेंडूत धमाकेदार शतक झळकावले आहे. कांगारू संघ मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे. त्याला दुसऱ्या टोकाला मार्कस स्टॉइनिस साथ देत आहे.
स्टीव्ह स्मिथच्या रूपाने ऑस्ट्रेलियाला दुसरा धक्का बसला आहे. स्मिथने अर्धशतक ठोकताच धावबाद झाला. जोश इंग्लिश शतकाच्या जवळ आहे.
https://twitter.com/kapildevtamkr/status/1727699151897686346
जोश इंग्लिशने आता ४३ चेंडूत ९४ धावा केल्या आहेत. आतापर्यंत त्याने ७ चौकार आणि ८ षटकार मारले आहेत. तर स्टीव्ह स्मिथ ३६ चेंडूत ६ चौकारांच्या मदतीने ४२ धावांवर खेळत आहे. १५ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर १५१ धावा आहे.
https://twitter.com/kapildevtamkr/status/1727699151897686346
ऑस्ट्रेलिया मोठ्या धावसंख्येकडे वाटचाल करत आहे
१४ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर १३० धावा आहे. जोश इंग्लिस ३९ चेंडूत ७ चौकार आणि ५ षटकारांच्या मदतीने ७५ धावांवर खेळत आहे. तर स्टीव्ह स्मिथ ३४ चेंडूत ६ चौकारांसह ४० धावांवर खेळत आहे. दोघांमध्ये ९९ धावांची भागीदारी झाली आहे.
https://twitter.com/Muhamma15874875/status/1727697325282496931
ऑस्ट्रेलियाचा स्टार फलंदाज जोस इंग्लिशने धमाकेदार अर्धशतक ठोकले आहे. दुसऱ्या टोकाला स्टीव्ह स्मिथही अप्रतिम फलंदाजी करताना दिसत आहे. यासह संघाने १०० चा टप्पा ओलांडला आहे. जोश इंग्लिशने अवघ्या २९ चेंडूत अर्धशतक झळकावले आहे. आतापर्यंत त्याने सात चौकार आणि चार षटकार मारले आहेत. १२ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर ११० धावा आहे.
प्रसीध कृष्णाने आठवे षटक टाकले. या षटकात एकूण १९ धावा आल्या. जोश इंग्लिशने या षटकात एक षटकार आणि तीन चौकार लगावले. ऑस्ट्रेलियाच्या डावातील १० षटके संपली आहेत. त्याने एका विकेटवर ८३ धावा केल्या आहेत. जोश इंग्लिश २५ चेंडूत ४४ तर स्टीव्ह स्मिथ २४ चेंडूत नाबाद २४ धावांवर खेळत आहे. दोघांनी दुसऱ्या विकेटसाठी ५२ धावांची भागीदारी केली.
पॉवरप्ले पूर्णपणे टीम इंडियाच्या नावावर राहिला. ६ षटकांनंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या एका विकेटवर केवळ ४० धावा आहे. स्टीव्ह स्मिथ १८ चेंडूंत तीन चौकारांसह १७ तर जोश इंग्लिस सात चेंडूंत दोन चौकारांसह ८ धावांवर खेळत आहेत.
भारतीय संघाचा फिरकीपटू रवी बिश्नोईने ऑस्ट्रेलिया संघाला पहिला धक्का दिला आहे. त्याने मॅथ्यू शॉर्टला क्लीन बोल्ड केले. तो १३ धावा काढून तंबूत परतला. पाच षटकानंतर ऑस्ट्रेलियाची धावसंख्या १ बाद ३५ धावा आहे. स्मिथ १६ धावांवर खेळत आहे.
ऑस्ट्रेलियासाठी मॅथ्यू शॉर्ट आणि स्टीव्ह स्मिथ सलामीसाठी मैदानात उतरले आहेत. ऑस्ट्रेलियाची नजर मोठ्या धावसंख्येवर असेल.
https://twitter.com/Shobhit110198/status/1727682448417534193
भारत : ऋतुराज गायकवाड, यशस्वी जैस्वाल, इशान किशन (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, रिंकू सिंग, अक्षर पटेल, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, मुकेश कुमार आणि प्रसीध कृष्णा.
https://twitter.com/BCCI/status/1727676048819495316
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ, मॅथ्यू शॉर्ट, जोश इंग्लिस, आरोन हार्डी, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/यष्टीरक्षक), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.
ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या टी-२० मालिकेतील पहिल्या सामन्यात भारताचा नवा कर्णधार सूर्यकुमार यादवने नाणेफेक जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. ऑस्ट्रेलिया संघ प्रथम फलंदाजी करेल. सूर्यकुमारने सांगितले की, शिवम दुबे, वॉशिंग्टन सुंदर, जितेश शर्मा आणि आवेश खान खेळत नाहीत.
सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली भारताचे युवा खेळाडू टी-२० फॉरमॅटमध्ये आपली जादू दाखवू इच्छित आहेत. सध्याच्या भारतीय संघातील बहुतेक खेळाडू असे आहेत, ज्यांची टीम इंडियामध्ये जागा निश्चित झालेली नाही. अशा परिस्थितीत यशस्वी जैस्वाल आणि तिलक वर्मा यांसारख्या खेळाडूंना टी-२०संघात आपली उत्कृष्ट कामगिरी सुरू ठेवून पुढील विश्वचषक संघासाठी आपला दावा मजबूत करायचा आहे. पुढील वर्षी जून महिन्यात टी-२० विश्वचषक होणार आहे. या स्पर्धेसाठी दोन्ही संघांची तयारी या मालिकेपासून सुरू होणार आहे.
ऑस्ट्रेलिया संघाने विश्वचषकाच्या फयनलमध्ये भारताला पराभूत केले होते, त्याच संघाविरुद्ध पुन्हा खेळावे लागल्याचे त्या पराभवाचे दु:ख भारतीय संघ नीट सहन करू शकला नसावा. या मालिकेत सूर्यकुमार यादव टीम इंडियाचे कर्णधार असेल, तर ऋतुराज गायकवाड पहिल्या तीन सामन्यांमध्ये उपकर्णधार असेल. श्रेयस अय्यर शेवटच्या दोन सामन्यांत पुनरागमन करेल आणि उपकर्णधार असेल.
भारत: इशान किशन (यष्टीरक्षक), ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव (कर्णधार), तिलक वर्मा, शिवम दुबे, रिंकू सिंग, अक्षर पटेल/वॉशिंग्टन सुंदर, रवी बिश्नोई, अर्शदीप सिंग, प्रसीध कृष्णा/आवेश खान, मुकेश कुमार.
https://twitter.com/BCCI/status/1727350653943775288
ऑस्ट्रेलिया : स्टीव्ह स्मिथ, मॅट शॉर्ट, आरोन हार्डी, जोश इंग्लिस, मार्कस स्टॉइनिस, टिम डेव्हिड, मॅथ्यू वेड (कर्णधार/विकेटकीपर), शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, जेसन बेहरेनडॉर्फ, तन्वीर संघा.
भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध मायदेशात १० टी-२० सामने खेळले आहेत, त्यापैकी ६ भारताने जिंकले आहेत, तर ऑस्ट्रेलियाने ४ सामने जिंकले आहेत. म्हणजेच टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला टी-२० क्रिकेटमध्ये घरच्या मैदानावर पराभूत केले आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात आतापर्यंत १० द्विपक्षीय टी-२० मालिका खेळल्या गेल्या आहेत. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या टी-२० मालिकेत भारताचा वरचष्मा असून ५-२ ने आघाडीवर आहे. भारताने ऑस्ट्रेलियाविरुद्ध १० पैकी ५ टी-२० मालिका जिंकल्या आहेत, तर ऑस्ट्रेलियाने २ टी-२० मालिका जिंकल्या आहेत. या दोन्ही संघांमध्ये ३ मालिका अनिर्णित राहिल्या आहेत. भारताने २०२२ मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्धची शेवटची टी-२० मालिका २-१ ने जिंकली होती.
वेदरकॉमने दिलेल्या हवामान अंदाजानुसार, गुरुवारी विशाखापट्टणममध्ये कमाल तापमान २९ अंश सेल्सिअस आणि किमान २३ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचेल. संपूर्ण सामन्यात पाऊस आणि ढगाळ आकाश राहण्याची १० टक्के आहे, त्यामुळे रात्रीच्या वेळी पावसाच्या अधूनमधून सरी येतील.
IND vs AUS T20 Highlights : प्रथमच राष्ट्रीय संघाचे कर्णधार असलेल्या सूर्यकुमार यादव आणि इशान किशन यांची अर्धशतके आणि दोघांमध्ये शतकी भागीदारी यांच्या जोरावर भारताने गुरुवारी येथे झालेल्या पहिल्या टी-20 सामन्यात जोश इंग्लिसला आपल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय शतकाच्या जोरावर पराभूत केले. ऑस्ट्रेलियाने दोन विकेट्स राखून पाच सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी घेतली आहे..