भारतीय संघाने इंग्लंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत २-० अशी आघाडी घेतली असली तरी भारतीय संघाचा उपकर्णधार अजिंक्य रहाणे गेल्या तीन सामन्यांत त्याच्या लौकिकाला साजेशी कामगिरी करू शकलेला नाही. भारतीय संघाच्या मधल्या फळीची भिस्त असलेल्या रहाणेने गेल्या दोन सामन्यांत तर पुरती निराशा केली. तंत्रशुद्ध फटकेबाजीसाठी ओळख असेलला रहाणे इंग्लिश गोलंदाजांच्या जाळ्यात अकडून स्वस्तात बाद झालेला पाहायला मिळाला. इंग्लंडविरुद्धचा चौथा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे मैदानात खेळवला जाणार आहे. अर्थात घरच्या मैदानात रहाणेकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा चाहत्यांना आहे. गेल्या तीन सामन्यांत झालेल्या चुका आणि फलंदाजीतील अपेक्षित बदल यांची माहिती करून घेण्यासाठी रहाणेने नुकतेच आपले प्रशिक्षक प्रविण अमरे यांची वांद्रे-कुर्ला संकुल येथील एमसीएच्या मैदानात भेट घेतली. प्रविण अमरे यांच्याकडून मार्गदर्शन घेण्यासाठी रहाणे एमसीएच्या मैदानात दाखल झाला होता. यावेळी अमरे यांनी रहाणेला मार्गदर्शन देखील केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

वाचा: …आणि प्रवीण अमरेंचा सल्ला अजिंक्यच्या कामी आला

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: India vs england 2016 ajinkya rahane turns to coach pravin amre to help him with his batting
First published on: 05-12-2016 at 12:39 IST