India vs England 3rd Test Live Updates: भारत आणि इंग्लंड यांच्यातील ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील तिसऱ्या सामन्याचा थरार लॉर्ड्सच्या मैदानावर सुरू आहे. या सामन्यातील पहिल्या डावात इंग्लंडने ३८७ धावांचा डोंगर उभारला. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाला देखील ३८७ धावा करता आल्या. त्यामुळे दुसरा डाव शून्यापासून सुरू झाला. इंग्लंडचा दुसरा डाव १९२ धावांवर आटोपला. भारतीय संघाला हा सामना जिंकण्यासाठी १९३ धावांची गरज आहे.

इंग्लंडने लॉर्ड्स कसोटी जिंकण्यासाठी भारतीय संघासमोर १९३ धावांचं आव्हान ठेवलं आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघाला चौथ्या दिवसाच्या सुरूवातीलाच ४ मोठे धक्के बसले. चौथ्या दिवशी फलंदाजी करताना यशस्वी जैस्वाल शून्यावर माघारी परतला. तर करूण नायर १४, शुबमन गिल अवघ्या ६ धावांवर माघारी परतला. नाइट वॉचमन म्हणून फलंदाजीला आलेला आकाशदीप १ धाव करत माघारी परतला. पाचव्या दिवशी भारतीय संघ धावांचा पाठलाग करून ऐतिहासिक विजय मिळवण्याच्या प्रयत्नात असणार आहे.

ऋषभ पंत स्वस्तात माघारी

पाचव्या दिवसाच्या सुरूवातीला ऋषभ पंतने काही आकर्षक फटके मारले. पण जोफ्रा आर्चरने टाकलेला चेंडू टप्पा पडून आत आला आणि ऋषभ पंतची दांडी गुल करून गेला. ऋषभ पंत ९ धावांवर माघारी परतला आहे.

केएल राहुल नंतर वॉशिंग्टन सुंदरनेही धरली पॅव्हेलियनची वाट

या डावात फलंदाजी करताना केएल राहुलवर मोठी जबाबदारी होती. कारण तो सावध होऊन फलंदाजी करत होता. पण बेन स्टोक्सने टाकलेला चेंडू आत आला आणि केएल राहुलला पायचित करून गेला. केएल राहुलला ३९ धावांवर माघारी परतावं लागलं आहे. त्यानंतर फलंदाजीला आलेला वॉशिंग्टन सुंदर शून्यावर बाद होऊन माघारी परतला आहे.

भारतीय संघ विजयाच्या जवळ

भारतीय संघाला पाचव्या दिवशी झटपट ४ मोठे धक्के बसले. पण रवींद्र जडेजा आणि जसप्रीत बुमराहने मिळून भारतीय संघाचा डाव सावरला आहे. भारतीय संघाला आता विजयासाठी ४८ धावांची गरज आहे.

रवींद्र जडेजाचं अर्धशतक पूर्ण

भारताचा अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा खंबीरपणे उभा राहिला आहे. त्याने आपलं अर्धशतक पूर्ण केलं आहे. भारताचे ९ फलंदाज माघारी परतले आहे. सिराज आणि जडेजाची जोडी मैदानावर आहे. भारताला जिंकण्यासाठी ३४ धावांची गरज आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या सामन्यात भारतीय संघ विजयाच्या अगदी जवळ पोहोचला होता. पण शेवटी मोहम्मद सिराज बाद होऊन माघारी परतल्यामुळे भारतीय संघाला हा सामना २२ धावांनी गमवावा लागला आहे.