भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी मालिकेत सध्या भारतीय संघाची कामगिरी फारशी आश्वासक होताना दिसत नाहीये. लॉर्ड्सवर सुरु असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुनही उपस्थित होता. अर्जुनने या दरम्यान काही भारतीय खेळाडूंसोबत सरावही केला, मात्र सध्या भारतीय संघाच्या कामगिरीपेक्षा अर्जुन तेंडुलकरची सोशल मीडियावर जास्त चर्चा सुरु आहे. लॉर्ड्सवरील या सामन्यादरम्यान तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरु असताना अर्जुन तेंडूलकर चक्क सीमारेषेबाहेर जाहीरातींच्या फलकामागे जाऊन झोपला. त्याचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

काही दिवसांपूर्वी अर्जुनने हरभजनसिंह सोबत लॉर्ड्स मैदानाच्या बाहेर रेडिओही विकले होते. गळ्यात डिजिटल रेडिओचा मोठा बॉक्स अडकवून लॉर्ड्स बाहेर सेल्समनच्या भूमिकेत शिरलेल्या अर्जुनचा हा अंदाज अनेकांना आवडला. दरम्यान दोनदिवसांपूर्वी झालेल्या पावसामुळे मैदानाची काळजी घेण्यासाठी धडपडणाऱ्या ग्राऊंड स्टाफच्या मदतीलाही अर्जुन धावून गेला होता. लॉर्ड्स क्रिकेट ग्राऊंटच्या अधिकृत अकाऊंटवरून मदतीसाठी धावून आलेल्या अर्जुनचा कौतुक करण्यात आलं होतं.

अवश्य वाचा – अर्जुन तेंडुलकर जेव्हा लॉर्ड्स बाहेर रेडिओ विकतो