Deepti Sharma Run Out : भारत-इंग्लंड महिला संघांमधील तीन एकदिवसीय सामन्यांची मालिका भारताने ३-० ने जिंकली. या मालिकेतील अंतिम सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळली. हा सामना भारताने १६ धावांनी जिंकला असला तरी भारताने मिळवलेला शेवटचा बळी वादाचे कारण ठरत आहे. भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने इंग्लंडची फंलदाज शार्लोट डीनला ज्या पद्धतीने धावबाद केले, त्यावर अनेक प्रतिक्रिया दिल्या जात आहे.

हेही वाचा >> रविवार विशेष : झुलनपर्वाची अखेर!

सामन्यात नेमकं काय घडलं?

भारताने विजयासाठी दिलेल्या १७० धावांचे लक्ष्य गाठण्यासाठी इंग्लंडच्या संघाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केले जात होते. इंग्लंडच्या १५३ धावा झाल्या होत्या. यावेळी मैदानात शार्लोट डीन आणि फ्रेया डेव्हिस ही जोडी फलंदाजी करत होती. इंग्लंड संघाकडून शार्लोट डीन ही एकटी किल्ला लढवत होती. तिने ८० चेंडूंमध्ये ४७ धावा केल्या. होत्या. मात्र ४३ व्या षटकाच्या तिसऱ्या चेंडूवर भारतीय गोलंदाज दिप्ती शर्माने क्रिकेटच्या नियमांचा पुरेपूर उपयोग करून घेतला. दिप्ती शर्माने चेंडू फेकण्याआधीच नॉन स्ट्राईकवर असलेल्या शार्लोट डीनने क्रीझ सोडले. हीच संधी साधत दिप्तीने शार्लोट डीनला धावबाद केले. याआधी फलंदाजाला अशा प्रकारे बाद करण्याला मंकडिंग म्हटले जायचे. विशेष म्हणजे मंकडिंग हे खेळभावनेविरोधी असल्याचा म्हटले जायचे. मात्र आता गोलंदाजाने फलंदाजाला अशा प्रकारे बाद केले, तर त्याला अधिकृतपणे धावबाद म्हणून बाद दिले जाते. याच बदललेल्या नियमांचा आधार घेत दिप्तीने शार्लोट डीनला धावबाद केले आणि सामन्यात विजय मिळवला.

हेही वाचा >> भारत-इंग्लंड एकदिवसीय मालिका : झुलनला निर्भेळ यशाची भेट!; तिसऱ्या सामन्यात भारतीय महिला संघाचा इंग्लंडवर १६ धावांनी विजय

दिप्ती शर्माने शार्लोट डीनला अशा प्रकारे धावबाद केल्यामुळे सोशल मीडियावर वेगवेगळ्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत. अशा प्रकारे फलंदाजाला बाद करणे म्हणजे खेळभावनाविरोधी कृत्य आहे, असे काही क्रिकेटप्रेमींचे म्हणणे आहे. तर दिप्ती शर्माने क्रिकेटविषयक नियमांचे पालन करूनच हा बळी घेतला, असे म्हणत काहीजण दिप्तीला पाठिंबा देत आहेत. दुसरीकडे धावबाद झाल्यामुळे शार्लोट डीनला अश्रू अनावर झाले. तिला मैदानावरच रडू कोसळले. यामुळेही अनेकांनी दिप्तीने मंकडिंगच्या मदतीने फलंदाजाला धावबाद करणे चुकीचे होते, असे म्हटले जात आहे. दरम्यान, भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रित कौरने दिप्तीला पाठिंबा दिला आहे. दिप्तीने क्रिकेटमधील नियमानुसारच बळी घेतला, अशी प्रतिक्रिया कौरने दिली आहे.

हेही वाचा >> विश्लेषण : ‘मंकडिंग’ला अधिकृत अधिष्ठान; ‘एमसीसी’चे नवे नियम काय आहेत?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने सुरुवातीला फलंदाजी करत ४५.४ षटकांत १६९ धावा केल्या. ही धावसंख्या गाठण्याचा इंग्लंड महिला क्रिकेट संघाकडून पूर्ण ताकदीने प्रयत्न केला जात होता. मात्र इंग्लंडचा संघ ४३.३ षटाकांतच बाद झाला. इंग्लंडला अवघ्या १५३ धावा करता आल्या.