IND vs NZ: टॉम लॅथम बाद होताच अश्विनने इतिहास रचला; हरभजन सिंगला टाकले मागे

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद करत इतिहास रचला

India vs New Zealand R Ashwin Test cricket highest wicket taker 2021
(फोटो सौजन्य- BCCI/ ट्विटर)

भारतीय संघाचा स्टार फिरकीपटू आर अश्विनने न्यूझीलंडचा सलामीवीर टॉम लॅथमला बाद करत इतिहास रचला. भारतासाठी सर्वाधिक कसोटी बळी घेण्याच्या बाबतीत, आर अश्विनने हरभजन सिंगला मागे टाकत टॉप तीन मध्ये धमाकेदार प्रवेश केला आहे. आर अश्विनने कारकिर्दीतील ८० व्या कसोटी सामन्यात ४१८ वी विकेट घेत ही मोठी कामगिरी केली. भारतासाठी ४०० हून अधिक कसोटी बळी घेणारे केवळ चार गोलंदाज आहेत, त्यापैकी तीन आता क्रिकेटपासून दूर आहेत. अनिल कुंबळे आणि कपिल देव निवृत्त झाले आहेत, तर हरभजन सिंगला संघात परतण्याची आशा नाही.

भारताकडून सर्वाधिक कसोटी बळी घेण्याचा विक्रम अनिल कुंबळेच्या नावावर आहे. अनिल कुंबळेने १३२ कसोटी सामन्यांमध्ये ६१९ बळी घेतले आहेत, त्यानंतर कपिल देव यांच्या नावावर १३१ कसोटी सामन्यांमध्ये ४३४ कसोटी बळी घेण्याचा विक्रम आहे. अश्विन कसोटी क्रिकेटमध्ये ज्या पद्धतीने गोलंदाजी करत आहे, त्यावरून येत्या चार-पाच कसोटी सामन्यांमध्ये तो कपिल देवलाही मागे टाकेल, असे दिसते.

IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर शुबमन गिल बनला ‘सुपरमॅन’; सूर मारत घेतला अफलातून झेल; पाहा VIDEO

५२ धावांची धडाकेबाज खेळी खेळल्यानंतर टॉम लॅथमला अश्विनने बोल्ड केले. चेंडूची गती त्याला समजली नाही आणि तो आऊट झाला. हा चेंडू त्याला कव्हर्समध्ये खेळायचा होता, पण त्याआधी त्याला बाद होऊन पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले. या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करत ३४५ धावा केल्या. प्रत्युत्तरात न्यूझीलंडचा पहिला डाव २९६ धावांवर आटोपला. भारताने दुसरा डाव सात बाद २३४ धावांवर घोषित केला आणि न्यूझीलंडसमोर विजयासाठी २८४ धावांचे लक्ष्य ठेवले. शेवटच्या दिवशी चहापानाच्या ब्रेकपर्यंत न्यूझीलंडने १२५ धावांत चार विकेट गमावल्या आहेत.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: India vs new zealand r ashwin test cricket highest wicket taker 2021 abn