IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर शुबमन गिल बनला ‘सुपरमॅन’; सूर मारत घेतला अफलातून झेल; पाहा VIDEO

सामन्याच्या पाचव्या दिवशी उमेश यादवनं भारताला यश मिळवून दिलं. त्यानं सॉमरविलेला शॉर्ट बॉल टाकला, तेव्हा…

ind vs nz shubman gill takes superb catch in kanpur test on day five
शुबमन गिलनं घेतला भन्नाट झेल

भारताचा सलामीवीर क्रिकेटपटू शुबमन गिलने कानपूरमध्ये सुरू असलेल्या न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या कसोटीत जबरदस्त झेल घेतला. सामन्याच्या पाचव्या दिवशी लंचनंतर उमेश यादवने भारताला दुसरे यश मिळवून दिले. त्याने नाईट वॉचमन विल सोमरविलेला तंबूत धाडले.

उमेशने ३६व्या षटकाच्या पहिला चेंडू सोमरविलेला आखुड टप्प्याचा खेळवला. सोमरविलेने तो पुल करण्याचा प्रयत्न केला. फाइन लेगला तैनात असलेल्या शुबमनने समोर धावत येत अप्रतिम झेल पकडला. शुबमनच्या या झेलमुळे भारताची विकेट घेण्याची आशा वाढली. सोमरविलेने सोमरविलेने ३६ धावा केल्या आणि लॅथमसोबत ७६ धावांची भागीदारी रचली.

हेही वाचा – “दुर्दैवीरित्या माझ्या देशात हे घडतंय…”, कानपूर कसोटीत कॉमेंट्री करणाऱ्या भारताच्या माजी क्रिकेटरचा ‘मोठा’ खुलासा!

कानपूर कसोटीचा आज शेवटचा दिवस आहे. पहिल्या डावात अर्धशतकी खेळी केलेला विल यंग दुसऱ्या डावात जास्त योगदान देऊ शकला नाही. फिरकीपटू रवीचंद्रन अश्विनने भारताला पहिले यश मिळवून दिले. त्याने यंगला (२) बाद केले. न्यूझीलंडकडून टॉम लॅथम आणि विल सोमरविले यांनी १ बाद ४ धावांवरून पुढे फलंदाजीला सुरुवात केली. लंचपर्यंत दोघांनी किल्ला लढवला. तत्पूर्वी श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने आपला दुसरा डाव ७ बाद २३४ धावांवर घोषित केला.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Ind vs nz shubman gill takes superb catch in kanpur test on day five adn

ताज्या बातम्या