भारत आणि न्यूझीलंड यांच्यातील मालिकेतील दुसरा आणि शेवटचा कसोटी सामना मुंबईतील वानखेडे स्टेडियमवर खेळवला जात आहे. मुंबईत जोरदार पाऊस झाल्याने खेळपट्टी ओली झाली होती. त्यामुळे नाणेफेकीला उशीर झाला. भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारताचा सलामीवीर मयंक अग्रवालने दमदार शतक ठोकत भारताचा डाव सावरला आहे. मयंकच्या शतकामुळे भारताने पहिल्या दिवसअखेर ४ बाद २२१ धावा केल्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने विराट कोहली, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा आणि श्रेयस अय्यर यांना तंबूत धाडत भारताचे कंबरडे मोडले. न्यूझीलंडची कमान केन विल्यमसनऐवजी टॉम लॅथमकडे सोपवण्यात आली आहे. विल्यमसन दुखापतीमुळे या कसोटीतून बाहेर पडला आहे.

भारताचा पहिला डाव

Kane Williamson being run out Video Viral
NZ vs AUS : केन विल्यमसन सहकारी खेळाडूला धडकला, अन् १२ वर्षात पहिल्यांदाच घडलं ‘असं’, VIDEO होतोय व्हायरल
kl rahul still not fit likely to miss 5th Test against england in dharamsala
केएल राहुल अजूनही जायबंदीच;अखेरच्या कसोटी सामन्यातही खेळण्याची शक्यता कमीच
Yashasvi Jaiswal is the second Indian batsman to hit most sixes in Tests against one team
IND vs ENG 4th Test : रांची कसोटीत यशस्वी जैस्वालचा खास पराक्रम, ‘या’ बाबतीत रोहित-सेहवागला टाकले मागे
Sajeevan Sajna hit a winning six off the last ball against Delhi Capitals
WPL 2024 : कोण आहे सजीवन सजना? जिच्या एका षटकाराने वेधले सर्व जगाचे लक्ष

भारताचे सलामीवीर शुबमन गिल आणि मयंक अग्रवाल यांनी दमदार सुरुवात केली. या दोघांनी पहिल्या गड्यासाठी ८० धावा केल्या. न्यूझीलंडचा फिरकीपटू एजाज पटेलने गिलला बाद करत भारताला पहिला धक्का दिला. गिलने ७ चौकार आणि एका षटकारासह ४४ धावा केल्या. त्यानंतर चहापानापर्यंत भारताला अजून दोन धक्के बसले. अनुभवी फलंदाज चेतेश्वर पुजारा आणि कप्तान विराट कोहली यांना एजाजनेच शून्यावर माघारी धाडले. त्यानंतर मुंबईकर फलंदाज श्रेयस अय्यर आणि मयंकने किल्ला लढवला. या दोघांनी संघाला दीडशे धावसंख्येपर्यंत पोहोचवले. दरम्यान मयंकने आपले अर्धशतकही पूर्ण केले. एजाजने पुन्हा गोलंदाजीला येत ही भागीदारी मोडली. त्याने श्रेयसला (१८) यष्टीपाठी झेलबाद केले. त्यानंतर मयंकने वृद्धिमान साहाला सोबत घेत धावसंख्या वाढवली. दिवसाच्या शेवटच्या सत्रात मयंकने आपले शतक पूर्ण केले. मयंक-साहाने अर्धशतकी भागीदारी रचक संघाची धावसंख्या दोनशेपार पोहोचवली. पहिल्या दिवसअखेर भारताने ७० षटकात ४ बाद २२१ धावा केल्या. मयंक १४ चौकार आणि ४ षटकारांसह १२० तर वृद्धिमान साहा २५ धावांवर नाबाद आहे.

भारतीय संघात मोठे बदल

बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, इशांत शर्मा, रवींद्र जडेजा आणि अजिंक्य रहाणे यांना दुसऱ्या कसोटीतून वगळण्यात आले आहे. इशांत शर्माच्या डाव्या हाताच्या बोटाला दुखापत झाली आहे. पहिल्या कसोटीत जडेजाच्या उजव्या हाताला दुखापत झाली होती आणि स्कॅनमध्ये सूज असल्याचे दिसून आले. त्याला विश्रांतीचा सल्ला देण्यात आला आहे. कानपूरमध्ये शेवटच्या दिवशी क्षेत्ररक्षण करताना रहाणेला हाताला किरकोळ दुखापत झाली. तो अद्याप पूर्णपणे बरा झालेला नाही.

हेही वाचा – IPL 2022 : साथ तुटली..! RCBचा यजुर्वेंद्र चहलला धक्का; संघाला ८ वर्ष दिल्यानंतर म्हणाला, ‘‘सर्व गोष्टींसाठी…”

दोन्ही संघांची प्लेईंग इलेव्हन

भारत – मयंक अग्रवाल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कप्तान), श्रेयस अय्यर, वृद्धिमान साहा (विकेटकीपर), रवीचंद्रन अश्विन, अक्षर पटेल, जयंत यादव, उमेश यादव, मोहम्मद सिराज.

न्यूझीलंड – विल यंग, ​​टॉम लॅथम (कप्तान), डॅरिल मिशेल, रॉस टेलर, हेन्री निकोल्स, टॉम ब्लंडल (विकेटकीपर), रचिन रवींद्र, काइल जेमीसन, टिम साऊदी, विल सोमरविले, एजाज पटेल.