India vs South Africa 1st Test : भारत विरुद्ध दक्षिण अफ्रिका कसोटी मालिकेला आजपासून सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्क स्टेडियमवर सुरूवात झाली. सामन्याच्या पहिल्या दिवशी भारताने ३ विकेट गमावत २७२ धावसंख्या उभी केलीय. कर्णधार विराट कोहलीने टॉस जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. यानंतर के एल राहुल आणि मयंक अग्रवाल या जोडीने ११७ धावांची दमदार सलामी खेळी केली.

के. एल. राहुलने सामन्याच्या पहिल्याच दिवशी आपलं ७ वं कसोटी शतकं झळकावलं. दुसरीकडे त्याच्यासोबत आलेल्या मयांक अग्रवालनेही अर्धशतकी ६० धावांची खेळी केली. मयांक बाद झाल्यानंतर मैदानात आलेल्या चेतेश्वर पुजारा गोल्डन डकचा बळी ठरला आणि त्याला खातंही उघडता आलं नाही. यानंतर आलेल्या कर्णधार विराट कोहलीने ३५ धावा केल्या, मात्र त्यालाही मोठी खेळी करता आली नाही. आज दिवसभराच्या अखेरीस राहुल १२२ आणि अजिंक्य रहाणे ४० धावांवर नाबाद होते. दक्षिण अफ्रिकेकडून लुंगी नगिडीने ३ विकेट घेतल्या.

भारताचा संघ –

केएल राहुल, मयंक अग्रवाल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली (कर्णधार), अजिंक्य रहाणे, ऋषभ पंत, आर. अश्विन, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज आणि शार्दुल ठाकुर या खेळाडूंचा समावेश आहे.

दक्षिण अफ्रिकेचा संघ –

डीन एल्गर (कर्णधार), एडन मार्कराम, कीगन पीटरसन, रॉसी व्हॅन डर ड्युसेन, टेम्बा बावुमा, क्विंटन डी कॉक, विआन मुल्डर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, कागिसो रबाडा, लुंगी एनगिडी.

हेही वाचा : India vs South Africa 1st Test : भारताने जिंकला टॉस, प्रथम फलंदाजीचा विराटने घेतला निर्णय

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, भारतीय संघाने दक्षिण आफ्रिकेत आतापर्यंत एकही कसोटी मालिका जिंकलेली नाही. मात्र, यावेळी विराटच्या नेतृत्वाखाली टीम इंडिया इतिहास रचून कसोटी मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने १९९२मध्ये पहिल्यांदा दक्षिण आफ्रिकेचा दौरा केला होता.