IND vs SA Test Series Schedule Live Streaming and Telecast Details : भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील दोन सामन्यांची कसोटी मालिका २६ डिसेंबरपासून सुरू होत आहे. मालिकेतील पहिला सामना बॉक्सिंग-डे कसोटी असेल. २६ डिसेंबरपासून म्हणजेच ख्रिसमसच्या दुसऱ्या दिवशी सुरू होणाऱ्या कसोटीला बॉक्सिंग-डे टेस्ट मॅच म्हणतात. या मालिकेत टीम इंडियाची धुरा रोहित शर्माच्या खांद्यावर असणार आहे. तो प्रथमच दक्षिण आफ्रिकेत कर्णधार म्हणून खेळताना दिसणार आहे. तत्पूर्वी या मालिकेतील सामने कधी आणि कुठे पाहता येणार जाणून घेऊया.

पहिली कसोटी किती वाजता खेळली जाईल?

दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना सेंच्युरियन येथील सुपरस्पोर्ट पार्क येथे खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार दुपारी १:३० वाजता सुरू होईल. अशा परिस्थितीत हा सामना पाहण्यासाठी चाहत्यांना रात्री उशिरापर्यंत जागे राहण्याची गरज भासणार नाही. हा पाच दिवसांचा सामना दररोज रात्री ९:३० वाजेपर्यंत खेळला जाईल. यानंतर दुसरा कसोटी सामना ३ जानेवारी ते ७ जानेवारी दरम्यान न्यूलॅंड्स, केपटाऊन येथे खेळवला जाईल.

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
Indian domestic cricketer salary
BCCI : भारताचे देशांतर्गत क्रिकेटपटू होणार मालामाल! पाकिस्तानच्या बाबर-रिझवानपेक्षा मिळणार जास्त मानधन
IPL 2024 Match Ticket Price Updates in Marathi
IPL 2024 : गुणतालिकेत नीचांकी, तिकीटं उच्चांकी; आरसीबीच्या मॅचच्या तिकिटाला मात्र ५० हजारांचा भाव
Gautam Gambhir Praises MS Dhoni
IPL 2024 CSK vs KKR : चेन्नईविरुद्धच्या सामन्यापूर्वी गंभीरचं मोठं वक्तव्य; म्हणाला, “धोनी हा एक कुशल…”

कुठे आणि कसे पाहता येणार लाइव्ह स्ट्रीमिंग –

भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील ही मालिका तुम्ही स्टार स्पोर्ट्सवर लाइव्ह पाहू शकता. डिस्ने प्लस हॉटस्टारच्या वेबसाइट किंवा अॅपवर तुम्ही या संपूर्ण मालिकेचे लाईव्ह स्ट्रीमिंग पाहू शकता.

हेही वाचा – IPL 2024 : एबी डिव्हिलियर्सचे मोठे वक्तव्य! म्हणाला, ‘पंजाब किंग्जला ‘या’ खेळाडूवर इतके पैसे खर्च करण्याची गरज नाही’

सेंच्युरियनमध्ये टीम इंडियाचा विक्रम –

सेंच्युरियनच्या सुपरस्पोर्ट पार्कमध्ये टीम इंडियाने आतापर्यंत ३ कसोटी सामने खेळले आहेत. त्यापैकी १ जिंकला आहे आणि २ गमावले आहेत. २०१०-११ दौऱ्यात भारताला येथे प्रथमच कसोटी सामना खेळताना एक डाव आणि २५ धावांनी पराभव पत्करावा लागला. यानंतर २०१७-१८ च्या दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाला १३५ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. तर २०२१-२२ च्या दौऱ्यात भारताने या मैदानावर कसोटी सामन्यात आफ्रिकेचा ११३ धावांनी पराभव केला होता.

कसोटी मालिकेसाठी दोन्ही देशाचे संघ –

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अभिमन्यू ईश्वरन, केएल राहुल (यष्टीरक्षक), रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, जसप्रीत बुमराह (उपकर्णधार) प्रसिध कृष्णा आणि केएस भरत (यष्टीरक्षक).

हेही वाचा – SA vs IND: ‘बॉक्सिंग डे’ कसोटीवर पावसाचे सावट, क्युरेटरने खेळपट्टीबाबत केले मोठे विधान; जाणून घ्या

दक्षिण आफ्रिका : टेम्बा बावुमा (कर्णधार), डेव्हिड बेडिंगहॅम, नांद्रे बर्जर, एडन मार्कराम, वियान मुल्डर, कागिसो रबाडा, ट्रिस्टन स्टब्स, काइल वेरेने, जेराल्ड कोएत्झी, टोनी डी जोर्गी, डीन एल्गर, मार्को जॅन्सेन, केशव महाराज, लुंगी एनगिडी, केशव महाराज, कीगन पीटरसन.