India vs Sri Lanka 1st T20 match : २०२३ या नवीन वर्षाची सुरुवात भारतीय संघ श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेन्टी-२० मालिकेपासून करणार आहे. ३ जानेवारीपासून भारत आणि श्रीलंकेमधील सामन्याला सुरुवात होणार आहे. नव्या वर्षात भारतीय संघ आपली सुरुवात विजयाने करण्याचा प्रयत्न करेल. रोहित शर्मा, विराट कोहली आणि के. एल. राहुलसारख्या खेळाडूंच्या अनुपस्थितीत हे ट्वेन्टी-२० सामने होणार आहेत.

हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ श्रीलंकेविरोधात मैदानात उतरणार आहे. तर, सूर्यकुमार यादवकडे उपकर्णधार पदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. भारतीय संघाने हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली न्यूझीलंडविरुद्धची ट्वेन्टी-२० मालिका जिंकली होती. त्यामुळे घरगुती मैदानावर होत असलेल्या श्रीलंकेविरोधातील मालिकेचं नेतृत्वही हार्दिक पांड्या करत आहे. तर, एकदिवशीय सामन्यापासून रोहित शर्मा पुनरागमन करण्याची शक्यता आहे.

Sandeep Sharma may replace Shami
RR vs MI : टीम इंडियाच्या तिसऱ्या वेगवान गोलंदाजाचा शोध संपला! ‘हा’ गोलंदाज घेऊ शकतो मोहम्मद शमीची जागा
Despite the efforts of PR Sreejesh the Indian hockey team lost
श्रीजेशच्या प्रयत्नांनंतरही भारतीय हॉकी संघाचा पराभव
Lucknow beat Gujarat by 33 runs in IPL 2024
LSG vs GT : लखनऊविरुद्धच्या पराभवानंतर शुबमन गिल संतापला; कोणावर फोडले खापर? घ्या जाणून
riyan parag
वेदनाशामक औषधे घेऊन रियान परागची निर्णायक खेळी!

ट्वेन्टी-२० सामना कधी, कुठं, कसा बघणार

भारत-श्रीलंका पहिला सामना कधी होणार?

भारत आणि श्रीलंकेमधील पहिला ट्वेन्टी-२० सामना मंगळवारी ( ३ जानेवारीला ) पार पडेल.

भारत-श्रीलंका पहिला सामना कुठं होणार?

भारत आणि श्रीलंका ट्वेन्टी-२० मालिकेतील पहिला सामना मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर होणार आहे.

आणखी वाचा – पृथ्वी शॉकडे दुर्लक्ष केल्यामुळे माजी खेळाडूने संघ व्यवस्थापनावर केली सडकून टीका; म्हणाला, ‘त्यांचे काम फक्त काय…’

भारत-श्रीलंका सामन्याला कधी सुरुवात होणार?

भारत आणि श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० पहिला सामना संध्याकाळी ७ वाजता सुरु होईल. तर, नाणेफेक संध्याकाळी ६.३० वाजता होणार आहे.

भारत-श्रीलंका सामन्याचं थेट प्रक्षेपण कुठं होईल?

भारत आणि श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० पहिल्या सामन्याचं थेट प्रक्षेपण स्टार स्पोर्ट्स नेटवर्कवर केलं जाणार आहे.

हेही वाचा – “रोहित येऊ द्या मग…” भारताचा ३६० डिग्री सूर्यकुमारच्या उपकर्णधार पदावरून गौतम गंभीरने केले महत्त्वाचे विधान

भारत-श्रीलंका सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग कुठं होईल?

भारत आणि श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० पहिल्या सामन्याचं लाईव्ह स्ट्रिमिंग डिस्ने हॉटस्टारवर होणार आहे.

भारत-श्रीलंका सामना मोफत कुठं पाहता येणार?

भारत आणि श्रीलंकेमधील ट्वेन्टी-२० पहिला सामना डीडी फ्री डिश असलेल्या डीडी स्पोर्ट्स चॅनेलवर मोफत प्रक्षेपण पाहता येणार आहे.