शिखर धवनच्या नेतृत्वात टीम इंडिया आज (मंगळवार) श्रीलंकेविरूद्ध दुसरा वनडे खेळण्यासाठी मैदानात उतरणार असून संघ तीन सामन्यांची मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. भारताने पहिला सामना ७ विकेटच्या फरकाने जिंकला. पहिल्या सामन्यात श्रीलंकेने ९ विकेट्सवर २६२ धावा केल्या. प्रत्युत्तरादाखल टीम इंडियाने ३६.४ षटकांत लक्ष्य गाठले. कर्णधार म्हणून शिखर धवनने पहिल्याच सामन्यात नाबाद ८६ धावांची खेळी केली.

आगामी ट्वेन्टी-२० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर या त्रिकुटाने भारतीय फलंदाजीची धुरा वाहिली. एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या किशन आणि सूर्यकुमार यांनी पहिल्या चेंडूपासून श्रीलंकेच्या गोलंदाजांवर हल्ला चढवला.

सामना कधी सुरू होईल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना आज २० जुलै रोजी भारतीय वेळेनुसार दुपारी ३ वाजता खेळला जाईल. नाणेफेक २ वाजून ३० मिनिटांनी होईल.

सामना कोठे पाहू शकाल?

भारत आणि श्रीलंका यांच्यातील दुसरा एकदिवसीय सामना सोनी स्पोर्ट्स नेटवर्कवर प्रसारित केला जाईल.

संघ

’भारत : शिखर धवन (कर्णधार), पृथ्वी शॉ, देवदत्त पडिक्कल, ऋतुराज गायकवाड, सूर्यकुमार यादव, मनीष पांडे, नितीश राणा, इशान किशन, संजू सॅमसन, हार्दिक पंडय़ा, कृणाल पंडय़ा, कृष्णप्पा गौतम, यजुर्वेद्र चहल, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती, राहुल चहर, दपी चहर, भुवनेश्वर कुमार, चेतन सकारिया, नवदीप सैनी.

’श्रीलंका : दसून शनाका (कर्णधार), धनंजया डी सिल्व्हा, अविष्का फर्नाडो, भानुका राजपक्सा, पथुम निसांका, चरिथ असलंका, वाहिंदू हसरंगा, अशेन बंदारा, मिनोद भानुका, लाहिरू उडारा, रमेश मेंडिस, चमिका करुणारत्ने, दुशमंथा चमीरा, लक्षण संदकन, अकिला धनंजया, शिरन फर्नाडो, धनंजया लक्षण, इशान जयरत्ने, प्रवीण जयविक्रमा, असिथा फर्नाडो, कसून रजिथा, लाहिरू कुमारा, इसुरू उडाना.