India vs UAE Live Streaming Details: भारतीय संघ आजपासून आपल्या आशिया चषक अभियानाला सुरूवात करणार आहे. भारतीय संघाचा पहिला सामना यूएईविरूद्ध होणार आहे. भारतीय संघाच्या नावे या स्पर्धेतील ८ जेतेपदं पटकावण्याचा विक्रम आहे. आता सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ नवव्यांदा जेतेपदाची ट्रॉफी जिंकण्याच्या प्रयत्नात असणार आहे. भारतीय संघाला जेतेपदासाठी प्रबळ दावेदार मानलं जात आहे. दरम्यान भारत विरूद्ध यूएई सामना लाईव्ह कुठे पाहता येणार? जाणून घ्या.

भारत- यूएई सामन्याबद्दल संपूर्ण माहिती

भारत विरूद्ध यूएई सामना बुधवारी, १० सप्टेंबरला खेळवला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार रात्री ८ वाजता सुरू होईल. तर स्थानिक वेळेनुसार हा सामना संध्याकाळ ६:३० वाजता सुरू होणार आहे. हा सामना दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियममध्ये खेळवला जाईल. हा सामना तुम्ही सोनी स्पोर्ट्स नेटवर्क किंवा सोनी लिव अॅपवर लाईव्ह पाहू शकता.

कसा राहिलाय दोन्ही संघांचा हेड टू हेड रेकॉर्ड?

भारत आणि यूएई हे दोन्ही संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये केवळ १ वेळेस आमनेसामने आले आहेत. २०१६ मध्ये झालेल्या आशिया चषकात यूएईला ९ गडी बाद ८१ धावा करता आल्या होत्या. या धावांचा पाठलाग करताना भारतीय संघाने ११ षटकात दिलेल्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला होता.

या खेळाडूंवर असेल नजर

या सामन्यात भारतीय संघातील २ खेळाडूंवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. ज्यात जसप्रीत बुमराह आणि शुबमन गिलचा समावेश आहे. गिलने आयपीएल स्पर्धेत दमदार कामगिरी केल्यानंतर इंग्लंडविरूद्ध झालेल्या कसोटी मालिकेतही धावांचा पाऊस पाडला. त्यामुळे त्याच्या कामगिरीवर सर्वांचं लक्ष लागून असणार आहे. तर दुसरीकडे संघातील सर्वात अनुभवी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या कामगिरीवरही सर्वांची नजर असणार आहे. बुमराहने गेल्या टी-२० वर्ल्डकप स्पर्धेतील ८ सामन्यांमध्ये १५ गडी बाद केले होते.

या स्पर्धेसाठी असे आहेत दोन्ही संघ :

भारतीय संघ: सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), अभिषेक शर्मा, तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग.

यूएईचा संघ: मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशन शराफू, आर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पराशर, इथन डी’सूझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मातीउल्लाह खान, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवदुल्लाह, मुहम्मद झोहेब, राहुल चोप्रा, रोहीद खान, सिमरनजीत सिंग, सगीर खान.