India vs UAE Pitch Report: आशिया चषक २०२५ स्पर्धेला दमदार सुरूवात झाली आहे. स्पर्धेतील पहिल्या लढतीत अफगाणिस्तानने हाँगकाँगचा ९४ धावांनी धुव्वा उडवला. स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारत आणि यूएई हे दोन्ही संघ आमनेसामने येणार आहेत. भारतीय संघाच्या नेतृत्वाची जबाबदारी सूर्यकुमार यादवकडे आहे. तो पहिल्यांदाच मोठ्या स्पर्धेत भारतीय संघाचं नेतृत्व करताना दिसून येणार आहे. भारतीय संघाने याआधी यूएईविरूद्ध झालेल्या सामन्यात ९ गडी राखून विजय मिळवला होता. हे दोन्ही संघ टी-२० आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये दुसऱ्यांदा आमनेसामने येणार आहेत. दरम्यान दुबईची खेळपट्टी कोणाला साथ देणार? जाणून घ्या.
भारत विरूद्ध यूएई पिच रिपोर्ट आणि हवामानाचा अंदाज ( India vs UAE Pitch Report And Weather Report)
याआधी झालेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फिरकी गोलंदाजांना चांगलीच मदत मिळाली होती. मात्र, यावेळी खेळपट्टीवर गवताचं प्रमाण अधिक असल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे वेगवान गोलंदाजांनाही मदत मिळू शकते. दुबईतील तापमान ४२ डिग्रीच्या पुढे जाणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. दरम्यान सामन्यावेळी तापमान ३६ डिग्रीच्या आसपास असेल. त्यामुळे खेळाडूंसह प्रेक्षकांनाही त्रास होऊ शकतो. दरम्यान नाणेफेक जिंकणारा संघ प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेऊ शकतो.
या मैदानावर कसा राहिलाय रेकॉर्ड? ( Dubai International Stadium Record)
एकूण सामने- ९३
प्रथम फलंदाजी करताना जिंकलेले सामने- ४६ सामने
धावांचा पाठलाग करताना जिंकलेले सामने- ४७ सामने
नाणेफेक जिंकून जिंकलेले सामने- ५३ सामने
नाणेफेक गमावून जिंकलेले सामने- ४० सामने
या मैदानावरील सर्वोच्च धावसंख्या- २ गडी बाद २१२ धावा
सर्वात कमी धावसंख्या- ५५
सर्वात मोठ्या धावांचा यशस्वी पाठलाग-८ गडी बद १८४ धावा
प्रथम फलंदाजी करताना सरासी धावसंख्या- १४५ धावा
असे आहेत दोन्ही संघ:
भारतीय संघ: अभिषेक शर्मा, सूर्यकुमार यादव (कर्णधार), शुबमन गिल (उपकर्णधार), तिलक वर्मा, हार्दिक पांड्या, शिवम दुबे, अक्षर पटेल, जितेश शर्मा (यष्टीरक्षक), जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंग, वरूण चक्रवर्ती, कुलदीप यादव, संजू सॅमसन (यष्टीरक्षक), हर्षित राणा, रिंकू सिंग
यूएईचा संघ: मुहम्मद वसीम (कर्णधार), अलीशन शराफू, आर्यांश शर्मा, आसिफ खान, ध्रुव पराशर, इथन डी’सूझा, हैदर अली, हर्षित कौशिक, जुनैद सिद्दीकी, मातीउल्लाह खान, मुहम्मद फारूक, मुहम्मद जवदुल्लाह, मुहम्मद झोहेब, राहुल चोप्रा, रोहीद खान, सिमरनजीत सिंग, सगीर खान.