IND vs WI 2nd ODI Updates, 24 July : भारत आणि वेस्ट इंडीज दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय क्रिकेट मालिका खेळवली जात आहे. या मालिकेतील दुसरा सामना आज (२४ जुलै) पोर्ट ऑफ स्पेनमधील क्वीन्स पार्क ओव्हल मैदानावरती झाला. हा सामना भारताने २ गडी राखून जिंकला. मधल्या फळीच्या शानदार कामगिरीमुळे भारताला मालिकेत विजयी आघाडी घेता आली. त्यापूर्वी वेस्ट इंडीजने ५० षटकांमध्ये सहा बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला होता. सलामीवीर शाय होपने १३५ चेंडूत ११५ धावांची खेळी केली.

Live Updates

IND vs WI 2nd ODI Live Updates : भारत विरुद्ध वेस्ट इंडीज दुसऱ्या एकदिवसीय सामन्यातील सर्व अपडेट्स

03:46 (IST) 25 Jul 2022
भारताचा आठवा गडी बाद

आवेश खानच्या रुपात भारताचा आठवा गडी बाद झाला आहे. भारताला विजयासाठी शेवटच्या षटकामध्ये ८ धावांची आवश्यकता आहे.

03:32 (IST) 25 Jul 2022
अक्षर पटेलचे अर्धशतक

अक्षर पटेलने एकदिवसीय कारकिर्दीतील पहिले अर्धशतक ठोकले. त्याने २७ चेंडूत ५२ धावा केल्या.

03:26 (IST) 25 Jul 2022
भारताचा सातवा गडी बाद

शार्दुल ठाकूरच्या रुपात भारताचा सातवा गडी बाद झाला आहे. भारताला विजयासाठी २५ चेंडूंत ३२ धावांची आवश्यकता आहे.

03:14 (IST) 25 Jul 2022
भारताचा सहावा गडी बाद

भारताचा सहावा गडी माघारी परतला आहे. दीपक हुडा ३३ धावा करून बाद झाला.

02:44 (IST) 25 Jul 2022
भारताचा पाचवा गडी बाद

संजू सॅमसनच्या रुपात भारताचा पाचवा गडी बाद झाला आहे. त्याने ५४ धावा केल्या.

02:17 (IST) 25 Jul 2022
श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद

श्रेयस अय्यरच्या रुपात भारताचा चौथा गडी बाद झाला आहे. त्याने ७१ चेंडूत ६३ धावा केल्या.

01:57 (IST) 25 Jul 2022
श्रेयस अय्यरचे दमदार अर्धशतक

श्रेयस अय्यरने अर्धशतक पूर्ण केले आहे. त्याने ५६ चेंडूंत ५० धावा केल्या. ३० षटकांमध्ये भारताच्या तीन बाद १६२ धावा झाल्या आहेत.

01:36 (IST) 25 Jul 2022
२५ षटकांमध्ये भारताच्या तीन बाद १२४ धावा

२५ षटकांमध्ये भारताच्या तीन बाद १२४ धावा झाल्या आहेत. भारताला विजयासाठी १८९ धावांची आवश्यकता आहे.

01:03 (IST) 25 Jul 2022
भारताचा तिसरा गडी बाद

सूर्यकुमार यादव अवघ्या ९ धावा करून बाद झाला आहे. मेयर्सच्या गोलंदाजीवर सूर्यकुमार त्रिफळाचित झाला. भारताच्या तीन बाद ७९ धावा झाल्या आहेत.

00:54 (IST) 25 Jul 2022
भारताचा दुसरा सलामीवीर तंबूत

शुबमन गिलच्या रुपात भारताचा दुसरा सलामीवीर तंबूत परतला आहे. त्याने ४९ चेंडूत ४३ धावा केल्या.

00:50 (IST) 25 Jul 2022
१५ षटकांमध्ये भारताच्या एक बाद ६५ धावा

१५ षटकांमध्ये भारताच्या एक बाद ६५ धावा झाल्या आहेत. शुबमन गिल आणि श्रेयस अय्यर डाव पुढे नेत आहेत.

00:34 (IST) 25 Jul 2022
भारताला पहिला धक्का

कर्णधार शिखर धवनच्या रुपात भारताला पहिला धक्का बसला आहे. शेफर्डच्या गोलंदाजीवर धवन १३ धावा करून बाद झाला.

00:28 (IST) 25 Jul 2022
१० षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४२ धावा

पाऊस थांबल्याने खेळाला पुन्हा सुरुवात झाली आहे. १० षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४२ धावा झाल्या आहेत.

00:11 (IST) 25 Jul 2022
पावसामुळे खेळ थांबला

पावसामुळे खेळ थांबवण्यात आला आहे. ९.४ षटकांमध्ये भारताच्या बिनबाद ४१ धावा झाल्या आहेत.

23:50 (IST) 24 Jul 2022
भारताची सावध सुरुवात

भारतीय सलामीवीरांनी सावधपणे डावाची सुरुवात केली आहे. पहिल्या पाच षटकांमध्ये भारताच्या बिनबाद २२ धावा झाल्या आहेत.

23:32 (IST) 24 Jul 2022
भारतीय डावाला सुरुवात

३१२ धावांचे आव्हान पार करण्यासाठी भारतीय फलंदाज मैदानावरती उतरले आहेत. सलामीवीर शुबमन गिल आणि शिखर धवन यांनी डावाची सुरुवात केली.

22:59 (IST) 24 Jul 2022
भारतासमोर विजयासाठी ३१२ धावांचे आव्हान

वेस्ट इंडीजने ५० षटकांमध्ये सहा बाद ३११ धावांचा डोंगर उभा केला आहे.

22:50 (IST) 24 Jul 2022
शाय होपच्या रुपात विंडीजचा सहावा गडी बाद

शतकवीर शाय होप बाद झाला आहे. त्याने १३५ चेंडूत ११५ धावा केल्या. वेस्ट इंडीजच्या ४९ षटकांमध्ये सहा बाद ३०१ धावा झाल्या आहेत.

22:37 (IST) 24 Jul 2022
वेस्ट इंडीजचा पाचवा गडी बाद

रोव्हमन पॉवेलच्या रुपात वेस्ट इंडीजचा पाचवा गडी बाद झाला आहे. शार्दुल ठाकूरने श्रेयस अय्यरकरवी त्याला बाद केले.

22:24 (IST) 24 Jul 2022
सलामीवीर शाय होपचे शतक

सलामीवीर शाय होपने आपल्या कारकिर्दीतील १००व्या सामन्यामध्ये शानदार शतक झळकावले आहे. त्याने १२५ चेंडूत शतक पूर्ण केले.

22:19 (IST) 24 Jul 2022
कर्णधार निकोलस पूरन माघारी

शार्दुल ठाकूरने खेळपट्टीवर जम बसवलेल्या निकोलस पूरनला बाद केले आहे. त्याने ७७ चेंडूत ७४ धावा फटकावल्या. ४४ षटकांमध्ये वेस्ट इंडीजच्या चार बाद २४९ धावा झाल्या आहेत.

22:06 (IST) 24 Jul 2022
निकोलस पूरन आणि शाय होपची शतकी भागीदारी

निकोलस पूरन आणि शाय होपने चौथ्या गड्यासाठी शतकी भागीदारी केली आहे.

21:57 (IST) 24 Jul 2022
कर्णधार निकोलस पूरनचे अर्धशतक

कर्णधार निकोलस पूरनने एकदिवसीय कारकिर्दीतील १०वे अर्धशतक केले आहे. त्याने ६१ चेंडूत ५० धावा पूर्ण केल्या. वेस्ट इंडीजच्या ४० षटकांमध्ये तीन बाद २१८ झाल्या आहेत.

21:35 (IST) 24 Jul 2022
३५ षटकांमध्ये विंडीजच्या तीन बाद १९१ धावा

सलामीवीर शाय होप आणि निकोलस पुरनच्या भागीदारीमुळे विंडीजचा संघ सध्या मजबुत स्थितीमध्ये आहे. ३५ षटकांमध्ये विंडीजच्या तीन बाद १९१ धावा झाल्या आहेत.

21:11 (IST) 24 Jul 2022
३० षटकांमध्ये विंडीजच्या तीन बाद १६५ धावा

३० षटकांमध्ये विंडीजच्या तीन बाद १६५ धावा झाल्या आहेत. सलामीवीर शाय होप शतकाच्या दिशेने वाटचाल करत आहे.

20:51 (IST) 24 Jul 2022
२५ षटकांमध्ये विंडीजच्या तीन बाद १४१ धावा

२५ षटकांमध्ये विंडीजच्या तीन बाद १४१ धावा झाल्या आहेत. शाय होप ६० तर निकोलस पूरन ५ धावांवर खेळत आहेत.

20:42 (IST) 24 Jul 2022
ब्रँडन किंग शून्यावर माघारी

युझवेंद्र चहलला आजच्या सामन्यात आपला पहिला बळी मिळाला. त्याने ब्रँडन किंगला शून्यावर माघारी पाठवले. विंडीजच्या २३ षटकांमध्ये तीन बाद १३१ धावा झाल्या आहेत.

20:36 (IST) 24 Jul 2022
वेस्ट इंडीजचा दुसरा गडी बाद

शामराह ब्रूक्सच्या रुपात वेस्ट इंडीजचा दुसरा गडी बाद झाला. ३५ धावा करणाऱ्या ब्रूक्सला अक्षर पटेलने बाद केले.

20:33 (IST) 24 Jul 2022
शाय होपचे शानदार अर्धशतक

सलामीवीर शाय होपने अर्धशतक पूर्ण केले. त्याने ७० चेंडूत ५१ धावा केल्या. वेस्ट इंडीजच्या २१ षटकांमध्ये एक बाद १२७ धावा झाल्या आहेत.

20:22 (IST) 24 Jul 2022
वेस्ट इंडीजचा धावफलक शंभरीपार

१८ षटकांमध्ये वेस्ट इंडीजचा धावफलक एक बाद शंभरीपार गेला आहे.