Icc womens world cup 2025: आयसीसी महिला वनडे वर्ल्डकप स्पर्धेत भारत आणि ऑस्ट्रेलिया या दोन्ही संघांमध्ये झालेल्या सामन्यात अटीतटीची लढत पाहायला मिळाली. भारतीय संघाने ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी ३३१ धावांचे आव्हान ठेवले होते. या धावांचा पाठलाग करताना शेवटच्या षटकात ऑस्ट्रेलियाने षटकार मारून विजयाची नोंद केली.

हा सामना ऑस्ट्रेलियाने ३ गडी राखून आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाला हा सामना जिंकण्यासाठी ३३१ धावा करायच्या होत्या. या धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाकडून कर्णधार आणि सलामीवीर फलंदाज एलिसा हेलीने १४२ धावांची दमदार खेळी केली. तर लिचफिल्डने ४० धावांची खेळी केली. भारतीय गोलंदाजांनी बेथ मुनी आणि सदरलँडला स्वस्तात माघारी धाडलं. पण गार्डनरने ४५ धावा करत ऑस्ट्रेलियाला पुनरागमन करून दिलं. शेवटी शेवटच्या षटकात षटकार मारून ऑस्ट्रेलियाने हा सामना ३ गडी राखून आपल्या नावावर केला.

भारतीय गोलंदाजांची झुंज

या सामन्यात धावांचा बचाव करताना भारतीय गोलंदाजांनी दमदार कामगिरी केली. पण थोडक्यात भारतीय गोलंदाज मागे पडले. भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना एन चरणीने १० षटकात ४१ धावा खर्च करत ३ गडी बाद केले. तर अमनजोत कौरने ६८ धावा खर्च करत २ गडी बाद केले. दिप्ती शर्माने ५२ धावा खर्च करत २ गडी बाद केले.

या सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेक जिंकून भारतीय संघाला प्रथम फलंदाजी करण्याचं आमंत्रण दिलं होतं. प्रथम फलंदाजी करण्यासाठी आलेल्या भारतीय संघाकडून सलामीवीर फलंदाज स्मृती मान्धना आणि प्रतिका रावल यांनी पहिल्या विकेटसाठी १५५ धावा जोडल्या. स्मृती मान्धनाने ८० धावांची खेळी केली. तर प्रतिका रावलने ७५ धावांची खेळी केली. हरलिन देओलने ३८ धावा केल्या. हरमनप्रीत कौरने २२ धावांची खेळी केली. जेमिमा रॉड्रिग्जने ३३ धावांची खेळी केली. ऋचा घोषने ३२ धावांची खेळी केली. भारताचा डाव ४८.५ षटकात ३३० धावांची खेळी केली.