India vs Pakistan, Asia Cup 2025: भारतीय संघाने आशिया चषक २०२५ स्पर्धेतील सुपर ४ मध्ये प्रवेश केला आहे. भारतीय संघाचा सुपर ४ फेरीतील पहिला सामना येत्या रविवारी (२१ सप्टेंबर) पाकिस्तानबरोबर रंगणार आहे. याआधी १४ सप्टेंबरला झालेल्या भारत- पाकिस्तान सामन्यात भारतीय संघाने एकतर्फी विजयाची नोंद केली होती. रविवारी क्रिकेट चाहत्यांना क्रिकेटचा डबल धमाका पाहायला मिळणार आहे. एकीकडे सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय संघ पाकिस्तानचा सामना करणार आहे. तर दुसरीकडे १९ वर्षांखालील संघ ऑस्ट्रेलियाविरूद्ध खेळणार आहे.

आयुष म्हात्रेच्या नेतृत्वाखाली खेळणारा भारतीय १९ वर्षांखालील संघ सध्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. दोन्ही संघांमध्ये ३ युथ वनडे सामन्यांची मालिका रंगणार आहे. त्यामुळे रविवारी आयुष म्हात्रे देखील अॅक्शनमध्ये दिसणार आहे. याआधी इंग्लंड दौऱ्यावर फलंदाजी करताना त्याने धावांचा पाऊस पाडला होता. आता ऑस्ट्रेलियाविरूद्ध देखील त्याच्याकडून चांगल्या कामगिरीची अपेक्षा असणार आहे. या दौऱ्यावर भारतीय संघ ३ युथ वनडे सामन्यांची मालिका खेळणार आहे. तर २ युथ कसोटी सामन्यांची मालिका देखील खेळणार आहे.

दोन्ही सामने किती वाजता सुरू होणार?

भारत आणि पाकिस्तान यांच्यात होणारा आशिया चषकातील सामना भारतीय वेळेनुसार हा सामना रात्री ८ वाजता सुरू होणार आहे. नाणेफेक ७:३० वाजता होईल. तर भारतीय १९ वर्षांखालील विरूद्ध ऑस्ट्रेलिया १९ वर्षांखालील यांच्यात होणारा सामना हा भारतीय वेळेनुसार सकाळी १० वाजता सुरू होणार आहे. तर नाणेफेक सकाळी ९:३० वाजता होईल. या सामन्यात कर्णधार आयुष म्हात्रे आणि स्फोटक फलंदाज वैभव सूर्यवंशीच्या कामगिरीकडे सर्वांचं लक्ष लागून असणार आहे.

भारत- ऑस्ट्रेलिया युथ मालिकेचं संपूर्ण वेळापत्रक

पहिला वनडे सामना- २१ सप्टेंबर ( नॉर्थ्स)

दुसरा वनसे सामना- २४ सप्टेंबर (नॉर्थ्स)

तिसरा वनडे सामना- २६ सप्टेंबर (नॉर्थ्स)

बहुदिवसीय कसोटी सामना

पहिला युथ कसोटी सामना- ३० सप्टेंबरपासून (नॉर्थ्स)

दुसरा युथ कसोटी सामना – ७ ऑक्टोबरपासून ( नॉर्थ्स)

ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी असा आहे भारतीय १९ वर्षांखालील संघ:

वैभव सूर्यवंशी, आयुष म्हात्रे (कर्णधार), विहान मल्होत्रा (उपकर्णधार),वेदांत त्रिवेदी, राहुल कुमार, अभिज्ञान कुंडू (यष्टीरक्षक), हरवंश सिंग (यष्टीरक्षक), आरएस अंबरीश, कनिष्क चौहान, नमन पुष्पक, हेनिल पटेल, डी. दिपेश, किशन कुमार, अनमोलजीत सिंग, खिलान पटेल, उधव मोहन, अमन चौहान.

राखीव खेळाडू : अलंकृत रापोल, अर्नव बुग्गा, युधाजीत गुहा, लक्ष्मण, बी.के. किशोर.