Ind Vs Eng Viral Memes : ओव्हल येथे झालेल्या इंग्लंडविरुद्धच्या पाचव्या कसोटी सामन्यात भारताने ज्या पद्धतीने ६ धावांनी रोमांचक विजय मिळवला, त्याचा अपेक्षा क्वचितच कोणी केली असेल. मोहम्मद सिराजने पाच विकेट घेत भारताच्या विजयाची नोंद केली. शेवटच्या दिवशी इंग्लंडला फक्त ३५ धावांची गरज होती, पण सिराजने इंग्लंडला तो आकडा गाठू दिला नाही, त्याने जेमी स्मिथला बाद केले आणि गस अॅटकिन्सनची महत्त्वाची विकेट पटकावली आणि भारतीय संघाने ६ विकेट्सनी संस्मरणीय विजय मिळवला.
सिराजच्या कामगिरीने चाहतेही थक्क झालेत. टीम इंडियासाठी सिराजच विजयाचा खरा हिरो असल्याचे मत चाहते व्यक्त करत आहे, त्याने सामन्यात एकूण ९ विकेट घेतल्या. सिराजच्या या जबरदस्त मॅचविनिंग कामगिरीमुळे सोशल मीडियावर डीएसपी सिराजचे एकापेक्षा एक भन्नाट मीम्स व्हायरल होत आहेत. दमदार खेळी
मोहम्मद सिराजच्या दमदार खेळीनंतर सोशल मीडियावर मीन्सचा पाऊस
भारत आणि इंग्लंड यांच्यातील या सामन्यात, सिराजने ज्याप्रकारे दमदार खेळी करत हा सामना भारताच्या बाजूने वळवला.