India Women ODI World Cup 2025 15 Memebers Squad Announced: आशिया चषकानंतर ३० सप्टेंबरपासून महिला वनडे विश्वचषक २०२५ खेळवला जाणार आहे. या स्पर्धेसाठी बीसीसीआयने १५ सदस्यीय संघाची घोषणा केली आहे. महिला एकदिवसीय विश्वचषकाचे यजमानपद भारताकडे आहे, तब्बल १२ वर्षांनी भारतात या स्पर्धेचं आयोजन केलं जात आहे. यापूर्वी भारताने २०१३ मध्ये ही स्पर्धा आयोजित केली होती. त्यावेळी भारत गट टप्प्यातच बाहेर पडला होता. भारतात होणाऱ्या या विश्वचषकात पाकिस्तानविरुद्धचे सामने श्रीलंकेत खेळवले जातील. यंदा टीम इंडिया विश्वचषकाच्या जेतेपदासाठी प्रबळ दावेदार बनू शकते.

महिला एकदिवसीय विश्वचषक ३० सप्टेंबरपासून भारत आणि श्रीलंकेत खेळवला जाणार आहे. ही स्पर्धा ८ संघांमध्ये खेळवली जाईल. नीतू डेव्हिड यांच्या अध्यक्षतेखालील महिला निवड समितीने या स्पर्धेसाठी १५ खेळाडूंची निवड केली आहे. निवडीनंतर नीतू डेव्हिड यांनी पत्रकार परिषदेत संघाची घोषणा केली.

आयसीसी महिला विश्वचषक २०२५ साठी हरमनप्रीत कौर संघाची कर्णधार असेल. तर स्मृती मानधनाची उपकर्णधार म्हणून निवड करण्यात आली आहे, जी बऱ्याच काळापासून ही जबाबदारी सांभाळत आहे. तर प्रतीका रावल ही स्मृतीची सलामीची जोडीदार असेल. हरलीन देओल, दीप्ती शर्मा आणि जेमिमा रॉड्रिग्ज सारख्या स्टार खेळाडू देखील या संघाचा भाग आहेत.

भारताची स्फोटक सलामीवीर शफाली वर्माला वर्ल्डकप संघातून डच्चू

शफाली वर्माला मात्र भारताच्या संघात स्थान निर्माण करता आलेलं नाही. शेफाली वर्माची अलिकडची कामगिरी फारशी चांगली राहिलेली नाही, तिला संघातूनही वगळण्यात आले होते. ती सध्या भारतीय अ संघाबरोबर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. याशिवाय ऋचा घोष, यस्तिका भाटिया यष्टीरक्षक म्हणून संघात आहेत. शिाय गोलंदाजीत रेणुका सिंह, अरूंधती रेड्डी, अमनजोत कौर, राधा यादव यांना संधी आहे. त्याचबरोबर संघात अष्टपैलू खेळाडूंची देखील आहेत.

महिलांच्या वनडे वर्ल्डकपसाठी भारताचा संघ

हरमनप्रीत कौर (कर्णधार), स्मृती मानधना (उपकर्णधार), प्रतिका रावल, हरलीन देओल, दीप्ती शर्मा, जेमिमाह रॉड्रिग्स, रेणुका सिंग ठाकूर, अरुंधती रेड्डी, ऋचा घोष (यष्टीरक्षक), क्रांती गौड, अमनजोत कौर, राधा यादव, श्री चरणी, यस्तिका भाटिया (यष्टीरक्षक) आणि स्नेह राणा

Women ODI World Cup 2025मधील भारताचं वेळापत्रक

३० सप्टेंबर २०२५ – भारत वि. श्रीलंका
५ ऑक्टोबर २०२५ – भारत वि. पाकिस्तान
९ ऑक्टोबर २०२५ – भारत वि. ऑस्ट्रेलिया
१९ ऑक्टोबर २०२५ – भारत वि. इंग्लंड
२३ ऑक्टोबर २०२५ – भारत वि. न्यूझीलंड
२६ ऑक्टोबर २०२५ – भारत वि. बांगलादेश