scorecardresearch

Premium

भारतीय महिला संघाकडून निराशा; इंग्लंडकडून पहिल्या ट्वेन्टी-२० सामन्यात ३८ धावांनी पराभूत; शफालीची एकाकी झुंज

या विजयाने इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

india women vs england women england women beat india women by 38 runs in first t20 match zws
नॅट स्किव्हर-ब्रंट

मुंबई : नॅट स्किव्हर-ब्रंट (५३ चेंडूंत ७७ धावा) व डॅनिएले  वॅट (४७ चेंडूंत ७५ धावा) यांच्या आक्रमक फलंदाजीनंतर फिरकीपटू सोफी एक्लेस्टोनच्या (१५ धावांत ३ बळी) प्रभावी माऱ्याच्या जोरावर इंग्लंडच्या महिला संघाने पहिल्या ट्वेन्टी-२० क्रिकेट सामन्यात भारतावर ३८ धावांनी विजय मिळवला. या विजयाने इंग्लंडने तीन सामन्यांच्या मालिकेत १-० अशी आघाडी मिळवली आहे.

इंग्लंड संघाने प्रथम फलंदाजी करताना ६ बाद १९७ धावा केल्या.  भारताला ६ बाद १५९ धावाच करता आल्या. मोठया धावसंख्येचा पाठलाग करताना भारताची सुरुवात चांगली झाली नाही. सलामीवीर स्मृती मनधाना (६) लवकर माघारी परतली. मैदानात आलेल्या जेमिमा रॉड्रिग्जलाही (४) फार काही करता आले नाही. यानंतर सलामीवीर शफाली वर्मा (५२) व कर्णधार हरमनप्रीत कौर (२६) यांनी संघाचा डाव सावरला. दोघांनीही संघाच्या धावसंख्येत भर घातली. मात्र, एक्लेस्टोनने कौरला बाद करत भारताला मोठा धक्का दिला. मग, रिचा घोषने (२१) शफालीच्या साथीने संघाचा डाव पुढे नेला. मात्र, मोठा फटका मारण्याच्या प्रयत्नात ती बाद झाली. दरम्यान, शफालीने आपले अर्धशतक पूर्ण केले. ती बाद झाल्यानंतर कनिका अहुजा (१५) व पूजा वस्त्रकार (नाबाद ११) यांनी धावा केल्या. मात्र, तोवर उशीर झाला होता. इंग्लंडकडून एक्लेस्टोनला स्किव्हर-ब्रंट (१/३५), साराह ग्लेन (१/२५) यांची साथ मिळाली.

England vs India match preview,
मायदेशातील वर्चस्व राखण्याची संधी! फिरकीला अनुकूल खेळपट्टीवर भारत इंग्लंड चौथी कसोटी आजपासून
virat kohli
इंग्लंडविरुद्धच्या उर्वरित कसोटी सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा; आकाश दीपला संधी
Nasir Hussain opinion on India England second test match sport news
बुमराची जादूई कामगिरी दोन संघांतील फरक! भारत-इंग्लंड दुसऱ्या कसोटी सामन्याबाबत नासिर हुसेनचे मत
India A team won the series by defeating England
IND A vs ENG Lions : भारत अ संघाने इंग्लड लायन्सचा १३४ धावांनी उडवला धुव्वा, तीन सामन्यांची मालिका २-० ने जिंकली

हेही वाचा >>> IND vs SA: टीम इंडियाच्या ‘या’ पाच युवा खेळाडूंवर असणार लक्ष, कोणते आहेत ते खेळाडू? जाणून घ्या

त्यापूर्वी, प्रथम फलंदाजीस उतरलेल्या इंग्लंडची सुरुवातही चांगली झाली नाही. भारताच्या रेणुका सिंह ठाकूरने (३/२७) सोफी डंकली (१) व अ‍ॅलिस कॅप्से (०) यांनी बाद करत इंग्लंडची अवस्था २ बाद २ अशी बिकट केली. मात्र, या स्थितीतून वॅट व स्किव्हर-ब्रंट यांनी संघाला सावरले. दोन्ही फलंदाजांनी तिसऱ्या गडय़ासाठी १३८ धावांची भागीदारी रचत संघाला सुस्थितीत पोहोचवले. वॅटने आपल्या खेळीत आठ चौकार व दोन षटकार झळकावले. तर, स्किव्हर-ब्रंटने १३ चौकार लगावले. या दोघी माघारी परतल्यानंतर एमी जोन्सने ९ चेंडूंत २३ धावा करत संघाला मोठया धावसंख्येपर्यंत पोहोचवले. भारताकडून ठाकूरला श्रेयांका पाटील (२/४४) व सैका इशक (१/३८) यांनी चांगली साथ दिली.

संक्षिप्त धावफलक

इंग्लंड : २० षटकांत ६ बाद १९७ (नॅट स्किव्हर-ब्रंट ७७, डॅनिएले  वॅट ७५; रेणुका सिंह ठाकूर ३/२७, श्रेयांका पाटील २/४४) विजयी वि. भारत : २० षटकांत ६ बाद १५९ (शफाली वर्मा ५२, हरमनप्रीत कौर २६, रिचा घोष २१; सोफी एक्लेस्टोन ३/१५, साराह ग्लेन १/२५)

सामनावीर : नॅट स्किव्हर ब्रंट

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: India women vs england women england women beat india women by 38 runs in first t20 match zws

First published on: 07-12-2023 at 02:26 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×