आशिया चषक स्पर्धेमध्ये भारतीय संघ चांगली कामगिरी करू शकला नाही. सुपर-४ फेरीत सलग दोन सामने गमावल्यामुले भारताचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले. दरम्यान, भारतीय संघ यूएईमधून परतला आहे. मात्र कर्णधार रोहित शर्मा मात्र अजूनही संयुक्त अरब अमिरातीमध्येच आहे. तो सध्याचा रिकामा वेळ आपल्या पत्नीसोबत घालवत असून त्याने पत्नी रितिका सजदेहसोबतचा एक फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.

हेही वाचा>>> शतक झळकावून कोहलीने सही केली अन् बॅटची किंमत थेट लाखोंमध्ये गेली; पाकिस्तानी फॅन म्हणतो “१ कोटी रुपये…”

आशिया चषक स्पर्धेतून बाहेर पडल्यानंतर रोहित शर्मा सध्या आपल्या कुटुंबाला वेळ देतोय. तो सध्या दुबईमध्ये असून त्याने पत्नी रितिका सदजेहसोबतचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. एका पंचतारांकित हॉटेलमधील हा फोटो आहे.

हेही वाचा>>> भारताचं बळ वाढणार! टी-२० विश्वचषकासाठी ‘हे’ दोन दिग्गज खेळाडू परतणार

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, आशिया चषक स्पर्धेत रोहित शर्माची कामगिरी साधारणच राहिली. त्याने या स्पर्धेत एकूण चार सामने खेळले. या सामन्यांत त्याने सरासरी ३३.२५ धावांप्रमाणे एकूण १३३ धावा केल्या. सुपर-४ फेरीतील शेवटच्या सामन्यात रोहितने विश्रांती घेतली. या सामन्यात संघाचे कर्णधारपद केएल राहुलकडे सोपवण्यात आले होते. हा सामना भारताने १०१ धावांनी जिंकला. पुढील महिन्यात ऑस्ट्रेलिया येथे टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. त्यासाठी संघनिवडीची प्रक्रिया सुरू झालेली आहे. येत्या १५ सप्टेंबर रोजी या स्पर्धेसाठी भारतीय संघाची घोषणा केली जाऊ शकते.