scorecardresearch

Premium

Asian Games: भारतीय पुरुष हॉकी संघाने रचला इतिहास, ९ वर्षांनी सुवर्णपदकावर कोरले नाव

19th Asian Games Updates: भारतीय पुरुष हॉकी संघाने आशियाई संघात इतिहास रचला आहे. फायनलमध्ये जपानचा पराभव करून सुवर्णपदक जिंकले. या विजयासह भारताने आशियाई क्रीडा स्पर्धेच्या इतिहासातील चौथे सुवर्णपदक जिंकले आहे. भारतीय पुरुष हॉकी संघाने पहिल्यांदा १९५८ मध्ये आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतला होता.

19th Asian Games 2023 Updates
१९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय पुरुष हॉकी संघाने जपानला पराभूत करत सुवर्णपदक पटकावले (फोटो-साई ट्विटर)

Indian men’s hockey team win the gold medal: १९व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय हॉकी संघाने सुवर्णपदक पटकावले आहे. टीम इंडियाने अंतिम फेरीत गतवेळच्या आशिया चॅम्पियन जपानचा ५-१ असा पराभव केला. याआधी पूल राऊंडमध्येही भारत आणि जपान आमनेसामने आले होते, ज्यामध्ये भारताने ४-२ ने विजय मिळवला होता. अंतिम सामन्यात भारताकडून खूप चांगला खेळ पाहायला मिळाला. भारतासमोर प्रतिस्पर्धी जपानला केवळ एकच गोल करता आला.

या सुवर्णपदकासह भारतीय हॉकी संघ २०२४ मध्ये पॅरिस येथे होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी पात्र ठरला आहे. सामन्याबद्दल बोलायचे झाले, तर पहिल्या क्वार्टरमध्ये दोन्ही संघांना गोल करता आला नाही. त्यानंतर दुसऱ्या क्वार्टरमध्ये सामन्याच्या २५व्या मिनिटाला भारताकडून सामन्यातील पहिला गोल करण्यात आला. मनदीप सिंगने हा गोल करत भारताला १-० अशी आघाडी मिळवून दिली. अशाप्रकारे सामन्याच्या हाफ टाईममध्ये भारतीय संघाने आघाडी घेतली.

U19 World Cup 2024 fastest fifty record
U19 World Cup 2024 : ६,६,६,६,४,६…दक्षिण आफ्रिकेच्या स्टीव्ह स्टॉकने ऋषभ पंतचा विक्रम मोडत रचला इतिहास
rohan bopanna matthew ebden
रोहन बोपण्णा ४३व्या वर्षी विजेता; ऑस्ट्रेलियन ओपन स्पर्धेत पुरुष दुहेरीत अजिंक्य
ICC has announced its best ODI squad for 2023
ICC ODI Team : आयसीसीने जाहीर केला २०२३ मधील सर्वोत्तम वनडे संघ, रोहित शर्मासह ‘या’ सहा भारतीयांना मिळाले स्थान
india to play match against Syria in asia cup football
भारताला विजय अनिवार्य; आशिया चषक फुटबॉलमध्ये आज सीरियाशी सामना

भारतासाठी कोणी-कोणी केले गोल –

भारताने जपानवर दणदणीत विजय मिळवला आहे. भारताने दुसऱ्या क्वार्टरमध्ये पहिला गोल केला. यानंतर तिसऱ्या क्वार्टर आणि चौथ्या क्वार्टरमध्ये भारताने प्रत्येकी दोन गोल केले. भारताकडून मनप्रीत सिंग (२५वे मिनिट), अमित रोहिदास (३६वे मिनिट), कर्णधार हरमनप्रीत सिंग (३२वे मिनिट) आणि अभिषेक (४८वे मिनिट) यांनी गोल केले. जपानसाठी तनाका सेरेनने एकमेव गोल केला.

हेही वाचा – World Cup 2023, PAK vs NED: बाबर आझम वर्ल्ड कपच्या पहिल्याच मॅचमध्ये ठरला फ्लॉप, सोशल मीडियावर युजर्सनी उडवली खिल्ली

भारतीय संघ संपूर्ण स्पर्धेत अपराजित राहिला –

सध्या सुरू असलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत भारतीय संघ जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. त्याने ग्रुप स्टेजमधील पाचही सामने जिंकले. टीम इंडियाने ग्रुप फेरीत ५८ गोल केले होते. त्याच्याविरुद्ध केवळ पाच गोल झाले. भारताने उपांत्य फेरीतही पाच गोल केले. मात्र, दक्षिण कोरियालाही तीन गोल करण्यात यश आले. भारताने अंतिम फेरीत पाच गोल केले आणि त्यांच्याविरुद्ध एकच गोल होऊ शकला. म्हणजे संपूर्ण स्पर्धेत भारताने ६८ गोल केले आणि त्यांच्याविरुद्ध फक्त ९ गोल झाले.

२०२३ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय पुरुष हॉकी संघाचा प्रवास –

पहिला सामना: उझबेकिस्तानचा १६-०असा पराभव.
दुसरा सामना : सिंगापूरचा १६-१ असा पराभव.
तिसरा सामना : जपानचा ४-२ असा पराभव.
चौथा सामना : पाकिस्तानचा १०-२ असा पराभव.
पाचवा सामना: बांगलादेशचा १२-० असा पराभव.
उपांत्य फेरी: दक्षिण कोरियाचा ५-३ असा पराभव.
अंतिम फेरी: २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेतील चॅम्पियन जपानला ५-१ ने पराभूत केले.

हेही वाचा – World Cup 2023: विश्वचषकापूर्वी शुबमन गिलनंतर ‘या’ अष्टपैलू खेळाडूने वाढवली भारताची डोकेदुखी; सराव सत्रात बोटाला झाली दुखापत

आशियाई क्रीडा स्पर्धेतील भारतीय पुरुष हॉकी संघाची कामगिरी –

भारतीय हॉकी संघाने, २०२३ आणि २०१४ च्या पूर्वी १९६६ आणि १९९८ च्या आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदक जिंकले होते. चार सुवर्णांव्यतिरिक्त, टीम इंडियाने १९५८, १९६२, १९७०, १९७४, १९७८, १९८२, १९९०, १९९४, २००२ आशियाई क्रीडा स्पर्धेत रौप्यपदक जिंकले होते, तर १९८६, २०१० आणि २०१८ आशियाई क्रीडा स्पर्धेत कांस्यपदक जिंकले होते.

Latest Comment
View All Comments
Post Comment

मराठीतील सर्व क्रीडा, वर्ल्डकप २०२३ बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Indian mens hockey team defeated japan to win the gold medal in the 19th asian games 2023 vbm

First published on: 06-10-2023 at 17:58 IST

संबंधित बातम्या

तुम्ही या बातम्या वाचल्या आहेत का? ×