भारताचा वेगवान गोलंदाज आणि लॉर्ड नावाने प्रसिद्ध असलेल्या शार्दुल ठाकुरने गर्लफ्रेंड मिताली परुळकरसोबत मुंबईत साखरपुडा केला आहे. दोघांच्या साखरपुड्याचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये हा सोहळा पार पडला. या कार्यक्रमाला फक्त जवळचे कुटुंबीयच उपस्थित होते. पुढील वर्षी ऑस्ट्रेलियात होणाऱ्या टी-२० विश्वचषकानंतर हे दोघे लग्न करणार असल्याची माहिती समोर आली आहे.

सध्या वर्कलोड मॅनेजमेंटचा भाग म्हणून शार्दुलला बीसीसीआयने विश्रांती दिली आहे. शार्दुल टीम इंडियाकडून तिन्ही फॉरमॅटमध्ये खेळला आहे. त्याने भारतासाठी आतापर्यंत ४ कसोटी, १५ एकदिवसीय आणि २४ टी-२० सामने खेळले आहेत. शार्दुलने अलीकडच्या काळात आपल्या फलंदाजीनेही सर्वांना प्रभावित केले आहे.

हेही वाचा – IND vs NZ : कानपूरच्या मैदानावर शुबमन गिल बनला ‘सुपरमॅन’; सूर मारत घेतला अफलातून झेल; पाहा VIDEO

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

विशेषत: ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंडविरुद्धच्या कसोटीत अर्धशतके झळकावून शार्दुलने फलंदाज म्हणूनही आपली ओळख मजबूत केली आहे. शार्दुलचा नुकत्याच पार पडलेल्या टी-२० वर्ल्डकपच्या भारतीय संघात समावेश करण्यात आला होता. मात्र, त्याला या स्पर्धेत केवळ दोन सामने खेळण्याची संधी मिळाली. यामध्ये त्याला एकही विकेट घेता आली नाही. चेन्नई सुपर किंग्जला आयपीएल २०२१चा चॅम्पियन बनवण्यात शार्दुलने महत्त्वाची भूमिका बजावली. त्याने या स्पर्धेत संघासाठी १६ सामन्यात २१ विकेट घेतल्या.