scorecardresearch

Murali Vijay: ‘भारतात वयाची तिशी ओलांडल्यानंतर क्रिकेटपटूंना लोक….’, अपयशानंतर भारतीय खेळाडूचे वक्तव्य

Murali Vijay On BCCI: मुरली विजयने भारताकडून ८७ सामने खेळले आहेत. त्याने २००८ मध्ये आपल्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला सुरुवात केली. परंतु बऱ्याच वर्षांपासून तो भारतीय संघातून बाहेर आहे. त्याला पुन्हा एकदा मैदानात पुनरागमन करायचे आहे.

Murali Vijay: ‘भारतात वयाची तिशी ओलांडल्यानंतर क्रिकेटपटूंना लोक….’, अपयशानंतर भारतीय खेळाडूचे वक्तव्य
मुरली विजय (फोटो- इंडियन एक्सप्रेस)

भारताचा अनुभवी सलामीवीर मुरली विजय अनेक दिवसांपासून आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर आहे. डिसेंबर २०१८ मध्ये त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध शेवटचा आंतरराष्ट्रीय कसोटी सामना कसोटी होता. तसेच विजयने सप्टेंबर २०२० मध्ये शेवटचा देशांतर्गत सामना खेळला. गेल्या वर्षभरापासून तो स्पर्धात्मक क्रिकेटचा भाग नाही. तो तामिळनाडू प्रीमियर लीग (TNPL) मध्ये शेवटचा स्पर्धात्मक सामना खेळला होता. आता मुरली विजयने आपल्या करिअरबद्दल महत्वाचे वक्तव्य केले आहे.

मुरली विजयने भारतासाठी ६१ कसोटी, १७ एकदिवसीय आणि ९ टी-२० आंतरराष्ट्रीय सामने खेळले आहेत. ३८ वर्षीय विजयला क्रिकेटमध्ये पुनरागमन करायचे आहे, पण तो भारतात नाही तर परदेशात संधी शोधत आहे. बीसीसीआय सोबतचा आपला वेळ संपला आहे, अशी प्रतिक्रिया त्याने दिली.

स्पोर्टस्टारवरील विकली शो डब्ल्यू व्ही रमन दरम्यान मुरली विजय म्हणाला, “बीसीसीआय (हसत) सोबतचा माझा वेळ जवळजवळ संपला आहे आणि मी परदेशात संधी शोधत आहे. मला काही स्पर्धात्मक क्रिकेट खेळायचे आहे.” उजव्या हाताच्या फलंदाजाने इंग्लंडमध्ये एसेक्ससाठी काउंटी क्रिकेट खेळले आहे.

हेही वाचा – IND vs AUS Test Series: भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर व्हायरल होतेय सरफराजची इंस्टा स्टोरी, पाहा आहे काय?

मुरली विजय पुढे म्हणाला, “भारतात ३० वर्षाच्या वयानंतर लोक आम्हाला रस्त्यावर चालणारा ८० वर्षांचा वयस्कर समजतात. माध्यमांनीही याकडे वेगळ्या नजरेने बघायला हवे. मला वाटते की तुम्ही तुमच्या ३० व्या वयात तुमच्या करिअरच्या शिखरावर असता. आत्ता इथे बसून मला वाटते की, मी सर्वोत्तम फलंदाजी करु शकतो. पण दुर्दैवाने संधी कमी असल्याने मला बाहेरच्या संधी शोधाव्या लागल्या.”

मराठीतील सर्व क्रीडा ( Krida ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 14-01-2023 at 16:57 IST

संबंधित बातम्या