आयसीसीने काल जुलै २०१९ ते मार्च २०२३ या पाच वर्षांचा फ्यूचर टूर प्रोग्राम जाहीर केला. यामध्ये कसोटी अजिंक्यपद स्पर्धा, वन-डे लीग अशा स्पर्धांचीही घोषणा करण्यात आली आहे. कसोटी अजिंक्यपद स्पर्धेत क्रमवारीतले सर्वोत्तम ९ संघ सहभागी होणार आहेत. त्यामुळे आगामी ५ वर्षात भारतीय क्रिकेटप्रेमींना भरघोस मनोरंजन मिळेल याची खात्री आहे.
आगामी पाच वर्षांमध्ये भारतीय संघाच्या वेळापत्रकाचा आपण थोडक्यात आढावा घेणार आहोत.
भारताचं घरच्या मैदानावरील कसोटी सामन्यांचं वेळापत्रक –
ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०१९ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ तर बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
जानेवारी ते मार्च २०२१ – इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका
नोव्हेंबर २०२१ – न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
फेब्रुवारी २०२२ – श्रीलंकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका
ऑक्टोबर २०२२ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका
————————————————————————————————
बाहेरच्या मैदानांवरील भारतीय संघाचे कसोटी सामन्यांचे वेळापत्रक –
जुलै २०१९ – वेस्ट इंडिज विरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
फेब्रुवारी २०२० – न्यूझीलंडविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
नोव्हेंबर ते डिसेंबर २०२० – ऑस्ट्रेलियाविरुद्ध ४ कसोटी सामन्यांची मालिका
जून ते ऑगस्ट २०२१ – इंग्लंडविरुद्ध ५ कसोटी सामन्यांची मालिका
डिसेंबर २०२१ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ कसोटी सामन्यांची मालिका
नोव्हेंबर २०२२ – बांगलादेशविरुद्ध २ कसोटी सामन्यांची मालिका
————————————————————————————–
घरच्या मैदानावर भारताचे मर्यादीत षटकांच्या सामन्यांचे वेळापत्रक –
नोव्हेंबर २०१९ – बांगलादेशविरुद्ध दोन टी-२०
डिसेंबर २०१९ – वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२०
जानेवारी २०२० – ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
मार्च २०२० – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
सप्टेंबर ते ऑक्टोबर २०२० – इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
मार्च २०२१ – अफगाणिस्तानविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
ऑक्टोबर २०२१ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
नोव्हेंबर ते डिसेंबर २०२१ – न्यूझीलंडविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
फेब्रुवारी २०२२ – वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका, श्रीलंकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
ऑक्टोबर २०२२ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
डिसेंबर २०२२ – श्रीलंकेविरुद्ध ५ वन-डे सामन्यांची मालिका
जानेवारी ते फेब्रुवारी २०२३ – न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
फेब्रुवारी ते मार्च २०२३ – आयसीसी विश्वचषक
————————————————————————————————-
भारताचे बाहेरच्या मैदानावरील मर्यादीत षटकांच्या सामन्याचे वेळापत्रक –
जुलै ते ऑगस्ट २०१९ – वेस्ट इंडिजविरुद्ध ३ वन-डे आणि ३ टी-२० सामन्यांची मालिका
फेब्रुवारी ते मार्च २०२० – न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका
जुलै २०२० – श्रीलंकेविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
ऑगस्ट २०२० – झिम्बाब्वेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
ऑक्टोबर २०२० – ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
ऑक्टोबर ते नोव्हेंबर २०२० – ऑस्ट्रेलियात टी-२० विश्वचषक
नोव्हेंबर २०२० ते जानेवारी २०२१ – ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
जुलै २०२१ – श्रीलंकेविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
डिसेंबर २०२१ ते जानेवारी २०२२ – दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ३ टी-२० सामन्यांची मालिका
मार्च २०२२ – न्यूझीलंडविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका
जुलै २०२२ – इंग्लंडविरुद्ध ३ वन-डे व ३ टी-२० सामन्यांची मालिका
ऑगस्ट २०२२ – वेस्ट इंडिजविरुद्ध ३ टी-२० व ३ वन-डे सामन्यांची मालिका
नोव्हेंबर २०२२ – बांगलादेशविरुद्ध ३ वन-डे सामन्यांची मालिका