एफआयएच कनिष्ठ विश्वचषक हॉकी स्पर्धेत उपांत्य फेरीत भारताचा पराभव झाला असून अंतिम फेरी गाठत विश्वचषक जिंकण्याचे भारताचे स्वप अपुरे राहिले आहे. आतापर्यंत तीन वेळा जेतेपदाला गवसणी घालणाऱ्या नेदरलँड्सने भारताचा ३-० ने पराभव केला आहे. दरम्यान पराभव झालेला असला तरी भारत मंगळवारी कांस्यपदकासाठी लढा देईल.

एफआयएच कनिष्ठ विश्चचषक स्पर्धेत उपांत्य फेरीत विजय संपादन करुन अंतिम फेरीत धडक मारण्याची भारताला संधी होती. मात्र आतापर्यंत तीन वेळा जेतेपद पटकावणाऱ्या नेदरलँड्सच्या खेळामुळे भारताचे हे स्वप्न अपुरेच राहिले. उपांत्य फेरीत भारत एकही गोल करू शकला नाही. तर दुसरीकडे नेदरलँडने भारताविरोधात तीन गोल करत सामन्यावर निर्वाद वर्चस्व गाजवले.

हेही वाचा >>> कुलदीप यादव रॉक्स ! ४४ धावांनी दिल्लीचा दणदणीत विजय, २१६ धावांचे लक्ष्य गाठताना केकेआरची दमछाक

पहिल्या क्वार्टरमध्ये भारताने चांगला खेळ केला. गोल करण्याची भारताला तीन वेळा संधी मिळाली. तिनही वेळा भारताच्या हाती अपयश आले. भारताची खेळाडू मुमताज खानने एक गोल करण्याचा प्रयत्न केला. पण चेंडू पोस्टला लागल्यामुळे गोल भेटला नाही. तर दुसरीकडे नेदरलँड्सची महिला खेळाडू बिट्स्माने पहिला गोल करत संघाचे खाते उघडले. बिट्स्माने गोल केल्यानंतर नेदरलँड संघाने ठराविक अंतराने आणखी दोन गोल केले. त्यामुळे नेदरलँड्सचा विजय पक्का झाला.

हेही वाचा >>> केकेआरच्या गोलंदाजांनी हात टेकले, पॉवरफुल वॉर्नरची तुफान फटकेबाजी, अर्धशतक झळकावून रचला ‘हा’ नवा विक्रम

हेही वाचा >>> चुकीच्या पद्धतीने बाद दिल्यामुळे विराट संतापला, आरसीबीने तर सांगितला थेट नियम, MI vs RCB सामन्यात पंचाची पुन्हा चूक?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारताने तिसऱ्या क्वॉर्टरमध्ये खेळामध्ये जम बसवला होता. मात्र अखेरच्या क्वॉर्टरमध्ये खेळ पुन्हा एकदा नेदरलँड्सच्या बाजूने झुकला. अंतिम क्वॉर्टरमध्ये लूने फोक्केने ५२ व्या मिनिटाला गोल केला. तर जीप डिकेनेही एक गोल करत नेदरलँड्सला मजबूत स्थितीत नेऊन विजय पक्का केला. दरम्यान, जर्मनी आणि इंग्लंडमधील सामन्यात जो संघ विजयी होईल त्या संघाशी नेदरलँड अंतिम सामन्यात दोन हात करेल.