टी-२० विश्वचषक २०२२ मधील सुपर-१२ टप्प्यातील चौथा सामना आज भारत-पाकिस्तान संघात खेळला जात आहे. हा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जातोय. भारत-पाक सामना म्हणजे क्रिकेटच्या चाहत्यासांठी पर्वणीच असतो. त्यामुळे चाहते या सामन्याची आतुरतेने वाट पाहत असतात. भारत-पाकिस्तान सामना नेहमीच हाय-प्रेशरचा असतो. अशात उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी भारत-पाक सामन्याबाबत एक मजेशीर ट्विट केले आहे, जे सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी रविवारी भारत-पाक सामन्यापूर्वी एक ट्विट केले आहे. ज्यामध्ये लिहले आहे की, ”मी सामन्यासाठी तयार आहे. स्वता; वर नजरेतून वाचण्यासाठीचा स्प्रे मारला आहे. माझ्याकडे अँटी-ट्रेस बॉल आणि जप करण्यासाठी माळ देखील ठेवली आहे.”

आनंद महिंद्रा यांनी पुढे लिहले की, ”मी टी.व्ही. बंद केला आहे. आता फक्त संध्याकाळी सामन्याचा निकाल पाहणार.” त्यांच्या या मजेशीर ट्विटची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे.

सामन्याबद्धल बोलायचे, तर भारत-पाक सामन्याची नाणेफेक फेकून रोहित शर्माने प्रथम गोलंदाजी निर्णय घेतला होता. तसेच पाकिस्तान संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी निमंत्रित केले होते. प्रथम फलंदाजी करायला आलेल्या पाकिस्तानची सुरुवात खराब झाली. संघाला पहिला धक्का कर्णधार बाबर आझमच्या रुपाने दुसऱ्या षटकात बसला. त्याला अर्शदीप सिंगने शून्य धावेवर तंबूत पाठवले.

शान मसूदने पाकिस्तानकडून सर्वाधिक धावा केल्या. त्याने ४० चेंडूत ५ चौकांराच्या मदतीने ५२ धावा चोपल्या. तसेच इफ्तिखार अहमदने देखील ५१ धावा केल्या. त्याने ३४ चेंडूचा सामना करताना, ४ षटकार आणि २ चौकाराच्या मदतीने धावा केल्या. त्यामुळे पाकिस्तान संघाला निर्धारित २० षटकांत ८ बाद १५९ धावा करता आल्या.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारतीय संघाकडून गोलंदाजी करताना, अर्शदीप सिंग आणि हार्दिक पांड्याने सर्वाधिक प्रत्येकी ३-३ विकेट्स घेतल्या. यामध्ये अर्शदीप सिंगने ३२ आणि हार्दिक पांड्याने २५ धावा दिल्या. त्याचबरोबर शमी आणि भुवनेश्वर कुमारने प्रत्येकी १-१ विकेट्स घेतली. त्याचबरोबर भारतीय संघाला विजयासाठी २० षटकांत १६० धावांची गरज आहे.