भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील चौथा आणि शेवटचा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळवला जात आहे. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने चमकदार कामगिरी केली. या मालिकेत कांगारू संघ प्रथमच ४०० हून अधिक धावा करण्यात यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियाच्या मोठ्या धावसंख्येमध्ये उस्मान ख्वाजाचे सर्वात महत्त्वाचे योगदान राहिले आहे. ख्वाजाने ४२२ चेंडूत १८० धावांची खेळी खेळली. त्याने एकूण २१ चौकार मारले.

ऑस्ट्रेलियाच्या डावाची सुरुवात करण्यासाठी आलेल्या ख्वाजाने सामन्याच्या सहाव्या सत्रापर्यंत फलंदाजी केली. या सामन्यात तो चांगलाच संपर्कात होता आणि भारतीय गोलंदाजांना त्याला बाद करण्याचा कोणताही मार्ग नव्हता. दुसऱ्या बाजूला सात विकेट्स पडल्या होत्या, पण एका बाजूला ख्वाजा तंबू ठोकून उभा होता. कर्णधार रोहितनेही आपल्या भात्यातील सर्व बाण आजमावले होते, पण काही निष्पन्न होत नव्हते. दरम्यान, चहापानानंतर रोहित काही वेळाने मैदानावर परतला.

रोहितच्या अनुपस्थितीत कर्णधारपदाची जबाबदारी चेतेश्वर पुजाराच्या खांद्यावर आली. पुजाराने अक्षर पटेलकडे चेंडू सोपवला आणि अक्षरनेच दुसरा चेंडू ख्वाजाच्या पायावर मारला. अंपायरने आऊट दिला नाही, पण पुजाराने लगेच रिव्ह्यू घेतला. रिप्लेमध्ये ख्वाजा आऊट झाल्याचे दिसून आले आणि भारताला सर्वात महत्त्वाची विकेट मिळाली. यानंतर ऑस्ट्रेलियाच्या शेपटाने जास्त त्रास दिला पण शेवटी ४८० सर्वबाद करत भारताने चांगली कामगिरी केली.

उस्मान ख्वाजाच्या पत्नीचे तुटले मन

उस्मानला अक्षर पटेलने बाद केले. अक्षर पटेलचा चेंडू लेग साईडच्या दिशेने खेळण्याच्या प्रयत्नात उस्मानने पॅडवरील चेंडू खाल्ला. अक्षर पटेलने एलबीडब्ल्यूचे अपील केले आणि अंपायरने त्याला नाबाद दिले. यानंतर रोहित शर्माच्या अनुपस्थितीत कर्णधार असलेल्या चेतेश्वर पुजाराने डीआरएस घेतला. डीआरएस घेण्याच्या पुजाराच्या या हावभावाने उस्मान आणि त्याच्या पत्नीचे मन तुटले. कारण उस्मान ख्वाजा LBW बाद झाला आणि दुहेरी शतक झळकावण्याचे त्याचे स्वप्न भंगले.

हेही वाचा: INDvsAUS 4th Test: “उठव त्याला इथून…”, रोहित शर्माने दिवस-रात्र मेहनत करणाऱ्या ग्राऊंड्समनला केली शिवीगाळ, Video व्हायरल

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सामन्यात काय झाले?

टीम इंडिया सध्या ऑस्ट्रेलियापेक्षा ३५१ धावांनी मागे आहे. तत्पूर्वी, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४८० धावांवर संपला. उस्मान ख्वाजाने १८० धावा, कॅमेरून ग्रीनने ११४ धावा आणि टॉड मर्फीने ४१ धावा केल्या. भारताकडून रविचंद्रन अश्विनने ६ विकेट्स घेतल्या. तिसऱ्या दिवशी उपाहारापर्यंत भारताने एक गडी गमावून १२९ धावा केल्या आहेत. सध्या शुबमन गिल ११९ चेंडूत ६५ धावा करून नाबाद असून चेतेश्वर पुजारा ४६ चेंडूत २२ धावा करून नाबाद आहे. दोघांमध्ये आतापर्यंत ५५ धावांची भागीदारी झाली आहे. रोहित शर्मा ३५ धावा करून बाद झाला. त्याला मॅथ्यू कुहनेमनने लाबुशेनच्या हाती झेलबाद केले.