चार सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारतीय संघाने २, तर ऑस्ट्रेलियाने १ सामना जिंकला आहे. पहिल्या तिन्ही कसोटीत ऑस्ट्रेलियाला संघर्ष करावा लागला. मात्र, चौथ्या कसोटीत त्यांनी पहिल्या तिन्ही सामन्यांचा हिशोब बरोबर केला. अहमदाबाद कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने तब्बल ४८० धावांचे आव्हान उभे केले. या सामन्यात ऑस्ट्रेलियाकडून उस्मान ख्वाजा आणि कॅमरून ग्रीन यांनी शतकी खेळी साकारली. चौथ्या सामन्यात ऑस्ट्रेलियाला रोखताना भारतीय गोलंदाजांची दमछाक झाल्याचे दिसले. यादरम्यान भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने असे काही केले त्यामुळे चाहते देखील नाराज झाले.

पहिल्या दिवसाचा खेळ संपत असताना भारतीय कर्णधार रोहित शर्माने अत्यंत वाईट कृत्य केले, ज्याचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. पहिल्या डावात भारताने संथ सुरुवात केली आणि एकही विकेट न गमावता ३६ धावा केल्या. त्याचवेळी प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाने ४८० धावा केल्या. सध्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला आहे.

रोहितने मैदानाच्या ग्राऊंड्समनला शिवीगाळ केली

वास्तविक, ही घटना ८.२ षटकांची आहे जेव्हा टीम इंडिया पहिल्या डावात फलंदाजी करत होती. ऑस्ट्रेलियन गोलंदाज कुहेनमनने रोहित शर्माकडे चेंडू टाकला, त्यावर त्याने पटकन एक धाव चोरली. रोहितने हलक्या हाताने चेंडू ऑफ साइडला टॅप करून एकेरी धाव चोरली. सिंगल घेतल्यानंतर रोहितने तेथे उपस्थित असलेल्या मैदानावरील ग्राऊंड्समनला शिवीगाळ केली. त्याचा व्हिडिओ व्हायरल होत आहे.

सामन्यात भारतीय संघाचा विचित्र रिव्ह्यू

मात्र, या सामन्याच्या १२८व्या षटकादरम्यान वेगळंच काहीतरी पाहायला मिळालं. या षटकात भारतीय फिरकीपटू रवींद्र जडेजा याने उस्मान ख्वाजा याला वाईड ऑफ स्टंपच्या दिशेने चेंडू टाकला. चेंडू थेट ख्वाजाच्या कोपराला जाऊन लागला. चेंडू आऊट साईडच्या ऑफ स्टंपच्या बाहेर होता आणि ख्वाजाने कोणताही शॉट मारण्याचा प्रयत्न केला नव्हता. मात्र, रोहित शर्मा आणि रवींद्र जडेजा यांनी रिव्ह्यू घेण्याचा निर्णय घेतला.

हेही वाचा: INDvsAUS 4th Test: “त्याला उमेश यादव-शमीचे वय…”, माजी प्रशिक्षक रवी शास्त्रींनी रोहित शर्माला पुन्हा डिवचले

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या विचित्र रिव्ह्यूची चर्चा कॉमेंट्री बॉक्समध्येही रंगली. रिव्ह्यू घेतल्यानंतर कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असलेले रवी शास्त्री, मॅथ्यू हेडन आणि दिनेश कार्तिक यांनी मजेशीर अंदाजात म्हटले, “असे वाटतंय की, भारतीय खेळाडू हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहेत की, तिसरे पंच सावध आहेत की नाहीत.” खरं तर हा निर्णय भारताच्या विरोधात गेला. त्यामुळे भारताला हा रिव्ह्यू गमवावा लागला. या सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाला ४८० धावांवर रोखले. भारताने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत १० षटकात नाबाद ३६ धावा केल्या.