मिलान : पहिल्या सत्राच्या भरपाई वेळेत हकान चाल्हानोग्लूने झळकावलेल्या गोलच्या जोरावर इंटर मिलानने चॅम्पियन्स लीग फुटबॉलच्या सामन्यात बार्सिलोनावर १-० अशा विजयाची नोंद केली.

सामन्याच्या सुरुवातीपासूनच दोन्ही संघांमध्ये चुरस पहायला मिळाली. घरच्या मैदानावर खेळणाऱ्या इंटरने मध्यंतरापूर्वी गोल करीत बार्सिलोनावर आघाडी मिळवली. त्यानंतर इंटरने भक्कम बचाव करीत ही आघाडी अखेपर्यंत राखत विजय नोंदवला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरीकडे, लिव्हरपूल आणि नापोली संघांनी आपापल्या लढतींमध्ये विजय मिळवला. लिव्हरपूलने रेंजर्सवर २-० अशी मात केली. लिव्हरपूलकडून ट्रेंट अ‍ॅलेक्झांडर-आर्नोल्ड (सातव्या मिनिटाला) आणि मोहम्मद सलाह (५३व्या मि.) गोल केले. लिव्हरपूलच्या बचावफळीसमोर रेंजर्सला एकही गोल झळकावता आला नाही. जिओकोमो रासपादोरीच्या (१८ व ४७व्या मि.) दोन गोलमुळे नापोलीने आयेक्सवर ६-१ असा विजय मिळवला.  तसेच बायर्न म्युनिकने व्हिक्टोरिया प्लाझानला ५-० असे नमवले. त्यांच्याकडून लिरॉय साने (७ व ५०व्या मि.), सर्ज गनाब्री (१३व्या मि.), सादिओ माने (२१व्या मि.) आणि आघाडीपटू एरिक मॅक्सिम चुपो-मोटिंग (५९व्या मि.) यांनी गोल नोंदवले.