सर्वोत्तम सांघिक खेळ करत भारताने नेपाळचा २-० असा पराभव केला आणि या दोन संघांमधील प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात शानदार कामगिरी केली.
भारताचा कर्णधार सुनील छेत्रीने २१व्या मिनिटाला भारतीय संघाचे खाते उघडले. हा गोल नोंदवत त्याने आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताकडून खेळताना सर्वाधिक गोल करण्याचा मान मिळवला. त्याने ४३ गोल करत माजी कर्णधार बायच्युंग भूतियाचा ४२ आंतरराष्ट्रीय गोलांचा विक्रम मोडला. भारताचा दुसरा गोल क्लिफर्ड मिरांडाने ४९व्या मिनिटाला केला.
दक्षिण आशियाई फुटबॉल स्पर्धेत नेपाळने भारतावर २-१ अशी मात केली होती. या पराभवाची परतफेड करताना भारताने सुरेख खेळ केला. भारताने नुकत्याच झालेल्या प्रदर्शनीय लढतीत फिलिपिन्सला १-१ असे बरोबरीत रोखले होते.
संग्रहित लेख, दिनांक 20th Nov 2013 रोजी प्रकाशित
आंतरराष्ट्रीय फुटबॉल मैत्रीपूर्ण सामना : भारताची नेपाळवर मात
सर्वोत्तम सांघिक खेळ करत भारताने नेपाळचा २-० असा पराभव केला आणि या दोन संघांमधील प्रदर्शनीय फुटबॉल सामन्यात शानदार कामगिरी केली.
First published on: 20-11-2013 at 03:21 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International friendly football match india beat nepal