नवव्या राज्यस्तरीय खुल्या नेटबॉल स्पर्धेचे आयोजन यंदा वध्र्यात ५ व ६ डिसेंबरला करण्यात आले आहे. राज्यातील सर्व जिल्हयांचे पुरूष व महिला संघ या स्पर्धेत सहभागी होणार आहेत.
वर्धा जिल्हा नेटबॉल असोसिएशन व अग्निहोत्री स्पोर्टस् अकादमीतर्फे आयोजित या स्पर्धा रामनगरातील अग्निहोत्री विद्या परिसरात होतील. उद्घाटन सोहळा ५ डिसेंबरला आमदार अमर काळे, जिल्हाधिकारी आशुतोष सलील व शंकरप्रसाद अग्निहोत्री यांच्या प्रमुख उपस्थितीत दुपारी तीन वाजता होणार आहे. स्पर्धेसाठी नेटबॉलचे चार मैदान तयार करण्यात आले आहे, अशी माहिती जिल्हा संघटनेचे अध्यक्ष सचिन अग्निहोत्री यांनी दिली. राज्यातील एकूण ७५० खेळाडू व ३० अधिकारी, तसेच पंचमंडळींचा या स्पर्धेत सहभाग राहणार आहे. समारोप सोहळा ६ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता विभागीय, क्रीडा संचालक सुभाष रेवतकर यांच्या उपस्थितीत होणार आहे. विजेत्यांना अग्निहोत्री स्पोर्टस् अकादमीतर्फे विशेष पुरस्कार देण्यात येणार आहेत.
संग्रहित लेख, दिनांक 5th Dec 2015 रोजी प्रकाशित
आजपासून राज्यस्तरीय खुली नेटबॉल स्पर्धा वध्र्यात
नवव्या राज्यस्तरीय खुल्या नेटबॉल स्पर्धेचे आयोजन यंदा वध्र्यात ५ व ६ डिसेंबरला करण्यात आले आहे.
Written by मंदार गुरव
First published on: 05-12-2015 at 00:17 IST
मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: International open netball competition in wardha