IPL 2019 MI vs SRH Updates : मुंबईच्या वानखेडे मैदानावर झालेल्या सामन्यात मनीष पांडेने शेवटच्या चेंडूवर लगावलेल्या षटकाराच्या बळावर हैदराबादने निर्धारित २० षटकात सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरमध्ये गेला. प्रथम फलंदाजी करताना हैदराबादने ८ धावा केल्या. ९ धावांचे आव्हान मुंबईने सहज पूर्ण केले आणि ‘प्ले-ऑफ्स’मध्ये स्थान पटकावले.

सामन्यात आणि सुपर ओव्हरमध्ये उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या जसप्रीत बुमराहला सामनावीर घोषित करण्यात आले. त्याने मूळ सामन्यात ४ षटकात ३१ धावा देत २ बळी टिपले. तसेच सुपर ओव्हरमध्ये जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज ६ चेंडू खेळू शकले नाहीत. ४ चेंडूत ८ धावा करून त्यांचे दोन्ही गडी बाद झाले.

मुंबईने दिलेल्या १६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वृद्धिमान साहाने चांगली सुरुवात केली होती. पण चौकार लगावण्याच्या प्रयत्नात लुईसने त्याचा अप्रतिम झेल टिपला. साहाने १५ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या. बेअरस्टो आणि वॉर्नर मायदेशी परतल्याने संघात स्थान देण्यात आलेल्या सलामीवीर मार्टिन गप्टिल याला बुमराहने पायचीत पकडले. त्याने १५ धावा केल्या. कर्णधार विल्यमसन चांगली कामगिरी करू शकला नाही. तो कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पंचांनी त्याला बाद ठरवले नव्हते, पण मुंबईने DRS ची मदत घेतल्यावर तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरवले. विजय शंकर १७ चेंडूत १२ धावा करून माघारी परतला. अभिषेक शर्मा बाद झाला आणि हैदराबादला पाचवा धक्का बसला. त्याने ३ चेंडूत २ धावा केल्या. हैदराबादचे गडी बाद होत असताना मनीष पांडेने एक बाजू लावून धरली आणि दमदार अर्धशतक केले.

मोहम्मद नबीने फटकेबाजी करून सामन्यात रंगत आणली. त्याने २० चेंडूत ३१ धावा केल्या. पण मोक्याच्या वेळीच तो बाद झाला. शेवटच्या चेंडूवर ७ धावा हव्या असताना मनीष पांडेने षटकार लगावून सामना बरोबरीत सोडवला. त्यामुळे सामना सुपर ओव्हरपर्यंत गेला.

त्याआधी मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. चांगली सुरुवात मिळालेला रोहित शर्मा खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोठा फटका खेळताना त्याचा मोहम्मद नबीने झेल टिपला. रोहितने ५ चौकरासह १८ चेंडूत २४ धावा केल्या. रोहित शर्मा बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवच्या साथीने क्विंटन डी कॉकने मुंबईचा डाव पुढे नेला आणि अर्धशतकी भागीदारी केली. सूर्यकुमार यादवने तडाखेबाज खेळी करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो बाद झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचत २३ धावा केल्या. एवीन लुईस उंच फटका खेळताना झेलबाद झाला आणि एका धावेवर माघारी परतला. गेल्या काही सामन्यात तुफान फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज हार्दिक पांड्या बाद झाला. १ चौकार आणि १ षटकार खेचल्यानंतर तो १८ धावांवर झेलबाद झाला.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

एकीकडे गडी बाद होत असताना सलामीवीर डी कॉकने मात्र संयम राखत ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे १० वे IPL अर्धशतक ठरले. कायरन पोलार्डकडून मोठ्या फटक्यांची मुंबईकरांना अपेक्षा होती, पण तो १० धावा काढून बाद झाला. क्विंटन डी कॉक याने नाबाद ६९ धावा केल्या. यात खेळीत त्याने ६ चौकार आणि २ षटकार लगावले. खलील अहमदने सर्वाधिक ३ बळी टिपले, तर भुवनेश्वर कुमार आणि मोहम्मद नबी यांनी १-१ गडी माघारी धाडला.

या सामन्यासाठी मुंबईच्या संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. पण हैदराबादच्या संघाने २ बदल केले आहेत. मार्टिन गप्टिल याने संघात स्थान देण्यात आले असून डेव्हीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय संदीप शर्माला वगळून बासील थंपी याला संधी देण्यात आली आहे.

Live Blog

00:07 (IST)03 May 2019
सुपर ओव्हरमध्ये मुंबईचा हैदराबादवर विजय; 'प्ले-ऑफ्स'मध्ये धडक

मुंबईकडून पोलार्ड आणि हार्दिक पांड्या मैदानावर

पहिला चेंडू - षटकार (हार्दिक पांड्या)

दुसरा चेंडू - १ धाव (हार्दिक)

तिसरा चेंडू - २ धावा

23:58 (IST)02 May 2019
सुपर ओव्हर - मुंबईला ९ धावांचे आव्हान

जसप्रीत बुमराहच्या भेदक माऱ्यापुढे हैदराबादचे फलंदाज ६ चेंडू खेळू शकले नाहीत. ४ चेंडूत ८ धावा करून त्यांचे दोन्ही गडी बाद झाले. त्यामुळे आता मुंबईला ९ धावांची गरज आहे.

23:57 (IST)02 May 2019
सुपर ओव्हर - हैदराबादची प्रथम फलंदाजी

मनीष पांडे आणि मोहम्मद नबी फलंदाजीसाठी मैदानावर

पहिला चेंडू - १ धाव आणि धावबाद (मनीष पांडे)
दुसरा चेंडू - १ धाव (गप्टिल)
तिसरा चेंडू - षटकार (नबी)
चौथा चेंडू - त्रिफळाचीत

हैदराबाद - सर्वबाद (२ गडी बाद) - ८ धावा 

23:54 (IST)02 May 2019
पांडेचा शेवटच्या चेंडूवर षटकार; ‘सुपर ओव्हर’ ठरवणार निकाल

पांडेचा शेवटच्या चेंडूवर षटकार; ‘सुपर ओव्हर’ ठरवणार निकाल

23:32 (IST)02 May 2019
मनीष पांडेचे दमदार अर्धशतक

हैदराबादचे गडी बाद होत असताना मनीष पांडेने एक बाजू लावून धरली आणि दमदार अर्धशतक केले.

23:13 (IST)02 May 2019
अभिषेक शर्मा बाद; हैदराबादला पाचवा धक्का

केल्या ३ चेंडूत २ धावा

23:05 (IST)02 May 2019
विजय शंकर बाद; हैदराबादला चौथा धक्का

विजय शंकर १७ चेंडूत १२ धावा करून माघारी परतला.

22:44 (IST)02 May 2019
कर्णधार विल्यमसन बाद; हैदराबादला तिसरा धक्का

कर्णधार विल्यमसन चांगली कामगिरी करू शकला नाही. तो कृणाल पांड्याच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. पंचांनी त्याला बाद ठरवले नव्हते, पण मुंबईने DRS ची मदत घेतल्यावर तिसऱ्या पंचांनी त्याला बाद ठरवले.

22:30 (IST)02 May 2019
मार्टिन गप्टिल पायचीत; हैदराबादला दुसरा धक्का

बेअरस्टो आणि वॉर्नर मायदेशी परतल्याने संघात स्थान देण्यात आलेल्या सलामीवीर मार्टिन गप्टिल याला बुमराहने पायचीत पकडले. त्याने १५ धावा केल्या.

22:22 (IST)02 May 2019
वृद्धिमान साहा झेलबाद; हैदराबादला पहिला धक्का

१६३ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना वृद्धिमान साहाने चांगली सुरुवात केली होती. पण चौकार लगावण्याच्या प्रयत्नात लुईसने त्याचा अप्रतिम झेल टिपला. साहाने १५ चेंडूत ५ चौकारांच्या मदतीने २५ धावा केल्या.

21:54 (IST)02 May 2019
डी कॉकचे अर्धशतक; हैदराबादला १६३ धावांचे आव्हान

क्विंटन डी कॉकने (६९*) नाबाद अर्धशतक झळकावले, पण शिस्तबद्ध गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण यांच्या बळावर हैदराबादने मुंबईला ५ बाद १६२ धावांवर रोखले. हैदराबादला विजयासाठी १६३ धावांचे आव्हान आहे.

21:43 (IST)02 May 2019
पोलार्ड झेलबाद; मुंबईला पाचवा धक्का

कायरन पोलार्डकडून मोठ्या फटक्यांची मुंबईकरांना अपेक्षा होती, पण तो १० धावा काढून बाद झाला.

21:30 (IST)02 May 2019
डी कॉकचे संयमी अर्धशतक

एकीकडे गडी बाद होत असताना सलामीवीर डी कॉकने मात्र संयम राखत ४७ चेंडूत अर्धशतक पूर्ण केले. हे त्याचे १० वे IPL अर्धशतक ठरले.

21:21 (IST)02 May 2019
धोकादायक हार्दिक बाद; मुंबईला चौथा धक्का

गेल्या काही सामन्यात तुफान फटकेबाजी करणारा धोकादायक फलंदाज हार्दिक पांड्या बाद झाला. १ चौकार आणि १ षटकार खेचल्यानंतर तो १८ धावांवर झेलबाद झाला.

21:03 (IST)02 May 2019
लुईस स्वस्तात माघारी; मुंबईला तिसरा धक्का

एवीन लुईस उंच फटका खेळताना झेलबाद झाला आणि एका धावेवर माघारी परतला.

20:59 (IST)02 May 2019
सूर्यकुमार यादव झेलबाद; मुंबईला दुसरा धक्का

सूर्यकुमार यादवने तडाखेबाज खेळी करण्याचा प्रयत्न केला. याच प्रयत्नात तो बाद झाला. त्याने ३ चौकार आणि १ षटकार खेचत २३ धावा केल्या.

20:57 (IST)02 May 2019
सूर्यकुमार यादव झेलबाद; मुंबईला दुसरा धक्का

सूर्यकुमार यादव झेलबाद; मुंबईला दुसरा धक्का

20:54 (IST)02 May 2019
डी कॉक - सूर्यकुमारने मुंबईचा डाव सावरला

रोहित शर्मा बाद झाल्यावर सूर्यकुमार यादवच्या साथीने क्विंटन डी कॉकने मुंबईचा डाव पुढे नेला आणि अर्धशतकी भागीदारी केली.

20:25 (IST)02 May 2019
रोहित शर्मा बाद; मुंबईला पहिला धक्का

चांगली सुरुवात मिळालेला रोहित शर्मा खलील अहमदच्या गोलंदाजीवर बाद झाला. मोठा फटका खेळताना त्याचा मोहम्मद नबीने झेल टिपला. रोहितने ५ चौकरासह १८ चेंडूत २४ धावा केल्या.

19:53 (IST)02 May 2019
हे आहेत संघातील बदल

मुंबईच्या संघात एकही बदल करण्यात आलेला नाही. पण हैदराबादच्या संघाने २ बदल केले आहेत. मार्टिन गप्टिल याने संघात स्थान देण्यात आले असून डेव्हीला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला आहे. याशिवाय संदीप शर्माला वगळून बासील थंपी याला संधी देण्यात आली आहे.

19:42 (IST)02 May 2019
नाणेफेक जिंकून मुंबईची प्रथम फलंदाजी

मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा याने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला आहे.