टीम इंडियाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनी हा सध्या IPL च्या तयारीत व्यस्त आहे. IPL स्पर्धेत त्याची कामगिरी धडाकेबाज होणार का? याबाबत सध्या चर्चा रंगल्या आहेत. IPL चा १२ वा हंगाम सुरु होणार असल्याने या पार्श्वभूमीवर मुंबई इंडियन्स संघाच्या प्रवासावर नेटफ्लिक्स एक माहितीपट प्रदर्शित करत आहे. या पाठोपाठच धोनीचा आत्तापर्यंतचा प्रवासही त्याच्या चाहत्यांना एका वेब सीरिजच्या माध्यमातून पाहता येणार आहे. ‘रोअर ऑफ द लायन’ या नावाने धोनीवर माहितीपट / वेब सीरिज ‘हॉटस्टार’ घेऊन येत आहे. या वेब सीरिजचा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे.
या सीरिजचा एक व्हिडीओ ५ मार्च रोजी प्रदर्शित झाला होता. त्यानंतर आता या वेब सीरिजचा दुसरा टिझर आज प्रदर्शित करण्यात आला आहे. ‘काही वर्षांपूर्वी आमच्या संघावर आणि खेळाडूंवर प्रश्न उपस्थित करण्यात आले, त्या प्रश्नाची आणि आरोपांची उत्तरे देणं गरजेचं होतं. काय करू.. जिद्द आहे म्हणजे आहेच…!’, असे या व्हिडीओत धोनी बोलताना दिसत आहे.
What doesn’t kill you, makes you stronger.
Watch #RoarOfTheLion, now streaming on #HotstarSpecials. https://t.co/mKn2EydLNG pic.twitter.com/IvzhHRahxc
— Hotstar Specials (@HotstarSpecials) March 20, 2019
या आधीच्या टीझरमध्ये ‘एक कहानी हैं, जो आपने अब तक नही सुनी’ म्हणजेच ‘एक कहाणी जी तूम्ही अजून ऐकली नाही’, असे धोनी म्हणताना दिसत होता.
Oru kadhai solta sir? An all-new Hotstar Special ft. #Thala @msdhoni #RoarOfTheLion #HotstarSpecials pic.twitter.com/FNryOvCMii
— Chennai Super Kings (@ChennaiIPL) March 5, 2019
तसेच, लाखो चाहते मैदानात आणि मैदानाबाहेर धोनीला MSD, कॅप्टन कूल, थाला आणि अजून बरेच काही म्हणत असतात. त्याला प्रोत्साहन देत असतात. धोनीची गोष्ट सर्वांना माहित आहे किंवा तुम्ही असा विचार करता. पण त्याच्याकडे सांगण्यासारखे आणखी काही आहे. त्याच्या जवळच्या मित्रांनाही माहित नसलेली अशी ही दुसरी गोष्ट आहे, असे या शोच्या सारांशामध्ये म्हटले होते. या आशयामुळे आता धोनीबद्दलच्या माहितीपटाची उत्सुकता अधिक वाढली आहे.