IPL 2019 : या स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले आणि या स्पर्धेचे साऱ्यांना वेध लागले. २३ मार्चपासून या स्पर्धेला सुरुवात होणार असून या स्पर्धेच्या पहिल्या २ आठवड्यांचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. या स्पर्धेचा पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू असा रंगणार आहे. माजी कर्णधार विरुद्ध सध्याचा कर्णधार असा सामना असणार आहे. त्यामुळे या सामन्याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे. तसेच आजी-माजी कर्णधारांमधील लढतींबरोबरच दुसऱ्या दिवशी या स्पर्धेत भारताच्या दोन सलामीवीरांमधील सामना रंगणार आहे. रोहित शर्माचा मुंबई इंडियन्स संघ विरुद्ध शिखर धवनचा दिल्ली कॅपिटल्स संघ या स्पर्धेच्या पहिल्याच आठवड्यात आमनेसामने येणार आहेत. २४ मार्चला हा सामना मुंबईच्या घरच्या मैदानावर रंगणार आहे.

या सामन्यासाठी दोनही संघ कसून सराव करत आहेत. या सामन्यात मुंबईच्या संघात सर्वधिक लक्ष हे युवराज सिंग याच्या खेळीकडे असणार आहे. तर दिल्लीच्या संघाला शिखर धवनकडून खूप अपेक्षा असणार आहेत. ३ खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवन पुन्हा दिल्लीकर झाला आहे. शिखर धवन दिल्लीच्या ड्रेसिंग रूममध्ये असल्याने काही नवोदित खेळाडूंना खूप फायदा होणार आहे. या बरोबरच धवन ड्रेसिंग रूममधील वातावरणदेखील हलके फुलके ठेवत आहे. सध्या शिखर धवन आणि ऋषभ पंत यांचा एक व्हिडीओ ऋषभ पंतने आपल्या इंस्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. यात ड्रेसिंग रुममधली धवन आणि पंत यांची धमाल मजा मस्ती दिसून येत आहे. या व्हिडिओला ऋषभ पंत याने एक अफलातून कॅप्शन दिले आहे.

पहा हा धमाल व्हिडीओ –

 

View this post on Instagram

 

Shankar ji on sher.

A post shared by Rishabh Rajendra saroj Pant (@rishabpant47) on

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, IPL 2019 मध्ये भारताचा सलामीवीर शिखर धवन हा दिल्ली संघाकडून खेळणार आहे. ३१ ऑक्टोबरला या बाबतची माहिती सूत्रांकडून देण्यात आली होती. त्यानंतर ५ नोव्हेंबरला या वृत्ताला अधिकृत दुजोरा मिळाला. त्यामुळे आधी हैदराबाद संघाकडून खेळणारा शिखर धवन आता दिल्ली संघाकडून खेळणार आहे. शिखर धवनच्या बदल्यात दिल्लाच्या संघाला मोठी किंमत मोजोवी लागली आहे. हैदराबादच्या संघाने शहाबाज नदीम, अभिषेक शर्मा आणि विजय शंकर या तीन खेळाडूंच्या बदल्यात शिखर धवनला दिल्लीच्या संघाकडे हस्तांतरित केले असल्याची माहिती देण्यात आली आहे. या संदर्भात दिल्ली डेअरडेव्हिल्सने अधिकृत ट्विटदेखील केले होते.

२००८ साली शिखर धवनने दिल्लीच्या संघाकडून पहिल्यांदा IPLमध्ये पदार्पण केले. त्यानंतर त्याचा प्रवास मुंबई इंडियन्स, डेक्कन चार्जर्स आणि सनरायझर्स हैदराबाद असा झाला. धवनने आतापर्यंत १४३ आयपीएल सामने खेळले असून त्यात ३३.२६ च्या सरासरीने आणि १२३.५३ च्या स्ट्राईक रेटने एकूण ४०५८ धावा केल्या आहेत.