डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी केलेल्या शतकी भागीदारीच्या जोरावर, सनराईजर्स हैदराबादने कोलकाता नाईट रायडर्सवर एकतर्फी मात केली आहे. हैदराबादने ९ गडी राखून सामना जिंकत, प्ले-ऑफच्या शर्यतीत आपलं स्थान कायम राखलं आहे. कोलकात्याने विजयासाठी दिलेलं १६० धावांचं आव्हान हैदराबादने सहज पूर्ण केलं. वॉर्नर-बेअरस्टो जोडीने पहिल्या विकेटसाठी १३१ धावांची भागीदारी केली. या खेळीदरम्यान दोन्ही खेळाडूंनी आपली अर्धशतकं साजरी केली. डेव्हिड वॉर्नर ६७ धावांवर त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. बेअरस्टोने नाबाद ८० धावांची खेळी केली.
कोलकात्याच्या गोलंदाजांनी हैदराबादच्या फलंदाजांवर अंकुश लावण्याचे आटोकाट प्रयत्न केले. मात्र क्षेत्ररक्षकांनी गचाळ कामगिरी करत गोलंदाजांच्या प्रयत्नांवर पाणी फिरवलं. कोलकात्याच्या खेळाडूंनी वॉर्नर-बेअरस्टो जोडीला बाद करण्याच्या अनेक सोप्या संधी दवडल्या. कोलकात्याकडून पृथ्वीराजने एकमेव बळी घेतला.
त्याआधी, ख्रिस लिनचे संयमी अर्धशतक (५१) आणि सुनील नरिन (२५) व रिंकू सिंग (३०) च्या उपयुक्त खेळी यांच्या बळावर कोलकाताने २० षटकात ८ बाद १५९ धावा केल्या आहेत. हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि कोलकाताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले. तडाखेबाज सुरुवात केलेला कोलकाताचा सलामीवीर सुनील नरिन याला खलील अहमदने अत्यंत चतुराईने त्रिफळाचीत केले. फटकेबाजी करताना खलीलने चेंडू फेकण्याचा वेगात केलेला बदल नरिनला समजू शकला नाही. त्यामुळे त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात तो त्रिफळाचीत झाला. त्याने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत २५ धावा केल्या.
यानंतर, फलंदाजी क्रमवारीत बढती मिळालेला शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. खलीलच्या चेंडूवर विजय शंकरने त्याचा अप्रितम झेल टिपला. त्याने केवळ ३ धावा केल्या. गेल्या सामन्यात तुफानी खेळी करणारा नितीश राणा या सामन्यात स्वस्तात बाद झाला. त्याने ११ चेंडूत ११ धावा केल्या आणि तो झेलबाद झाला. कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक हा चोरटी धाव घेताना धावचीत झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. त्याने ४ चेंडूत केवळ ६ धावा केल्या. यापाठोपाठ रॉबिन उथप्पाच्या जागी संघात स्थान मिळालेल्या रिंकू सिंहने ३० धावांची छोटेखानी खेळी केली. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर रशीद खानने त्याचा उत्तम झेल टिपला.
दुसऱ्या बाजूनला सलामीला आलेला ख्रिस लिन संयमी अर्धशतकानंतर बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. यात ४ चौकार आणि एका षटकाराचा समावेश होता. फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला आंद्रे रसल स्वस्तात झेलबाद झाला. त्याला केवळ १५ धावांचीच भर घालता आली. पियुष चावलादेखील चांगली खेळी करू शकला नाही. अखेर करिअप्पाने शेवटच्या षटकात फटकेबाजी करत कोलकाताला १५९ धावांचा टप्पा गाठून दिला.

हैदराबादची कोलकात्यावर ९ गडी राखून मात
शतकी भागीदारी आणि अनेक जीवदानांनंतर डेव्हिड वॉर्नर त्रिफळाचीत, हैदराबादला पहिला धक्का.
पृथ्वीराजने घेतला बळी
हैदराबाची विजयाच्या दिशेने वाटचाल
कोलकात्याचे गोलंदाज हैदराबादच्या फलंदाजांसमोर निष्प्रभ
डेव्हिड वॉर्नर आणि जॉनी बेअरस्टो यांनी पहिल्या विकेटसाठी शतकी भागीदारी करत संघाला भक्कम सुरुवात करुन दिली आहे
ख्रिस लिनचे संयमी अर्धशतक (५१) आणि सुनील नरिन (२५) व रिंकू सिंग (३०) च्या उपयुक्त खेळी यांच्या बळावर कोलकाताने २० षटकात ८ बाद १५९ धावा केल्या आणि हैदराबादला १६० धावांचे आव्हान दिले.
फटकेबाजीसाठी प्रसिद्ध असलेला आंद्रे रसल स्वस्तात झेलबाद झाला. त्याला केवळ १५ धावांचीच भर घालता आली.
सलामीला आलेला ख्रिस लिन संयमी अर्धशतकानंतर बाद झाला. त्याने ४७ चेंडूत ५१ धावा केल्या. यात ४ चौकार आणि १ षटकार समाविष्ट होता.
रॉबिन उथप्पाच्या जागी संघात स्थान मिळालेला रिंकू सिंग ३० धावा करून माघारी परतला. संदीप शर्माच्या गोलंदाजीवर रशीद खानने त्याचा उत्तम झेल टिपला.
कोलकाताचा कर्णधार दिनेश कार्तिक हा चोरटी धाव घेताना धावचीत झाला आणि कोलकाताला चौथा धक्का बसला. त्याने ४ चेंडूत केवळ ६ धावा केल्या.
गेल्या सामन्यात तुफानी खेळी करणारा नितीश राणा या सामन्यात स्वस्तात बाद झाला. त्याने ११ चेंडूत ११ धावा केल्या आणि तो झेलबाद झाला.
फलंदाजीच्या क्रमवारीत बढती मिळालेला शुभमन गिल पुन्हा एकदा अपयशी ठरला. खलीलच्या चेंडूवर विजय शंकरने त्याचा अप्रितम झेल टिपला. त्याने केवळ ३ धावा केल्या.
तडाखेबाज सुरुवात केलेला कोलकाताचा सलामीवीर सुनील नरिन याला खलील अहमदने अत्यंत चतुराईने त्रिफळाचीत केले. फटकेबाजी करताना खलीलने चेंडू फेकण्याचा वेगात केलेला बदल नरिनला समजू शकला नाही. त्यामुळे त्याने मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला, त्यात तो त्रिफळाचीत झाला. त्याने ८ चेंडूत ३ चौकार आणि २ षटकार खेचत २५ धावा केल्या.
रॉबिन उथप्पा, कुलदीप यादव आणि प्रसिध कृष्णा या तिघांना संघाबाहेर करण्यात आले असून रिंकू सिंग, के सी करिअप्पा, पृथ्वी राज यांना स्थान देण्यात आले आहे.
--
हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसन याने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला.