आयपीएलच्या बाराव्या हंगामात चेन्नई सुपरकिंग्ज संघाने चांगली सुरुवात केली आहे. पहिल्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु आणि दुसऱ्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स संघावर चेन्नईने मात केली. सध्या सोशल मीडियावर चेन्नईच्या संघाचा पहिल्या सामन्यानंतरचा व्हिडीओ व्हायरल होतो आहे. बंगळुरुविरुद्धचा पहिला सामना जिंकल्यानंतर, चेन्नई विमानतळावर मोहीत शर्मा मोबाईलवर आपल्या सर्व सहकाऱ्यांच्या प्रतिक्रीया विचारताना दाखवला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

यावेळी केदार जाधवने, पहिल्या सामन्यातील विजयात आपला मोलाचा हातभार लागला याबद्दल आनंद व्यक्त केला. मागच्या हंगामात चेन्नईने पहिला सामना जिंकला तेव्हा मी मैदानात होतो आणि यंदाच्या हंगामात पहिल्या विजयाच्यावेळीही मी मैदानात आहे, याचा मला आनंद आहे. यावेळी धोनीने केदारला, यंदा परत घरी जायचा प्लान आहे का?? असा प्रश्न विचारत त्याची फिरकी घेतली. मागच्या हंगामात पहिल्या सामन्यात केदारला दुखापत झाली होती. यानंतर त्याला संपूर्ण हंगामाला मुकावं लागलं होतं.

पहिल्या दोन सामन्यात विजय मिळवल्यानंतर चेन्नईची आगामी लढत राजस्थान रॉयल्स संघाविरुद्ध आहे.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2019 toh ghar jaane ka wapas plan hai ms dhoni hilariously trolls kedar jadhav in viral video
First published on: 27-03-2019 at 14:13 IST