आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव नुकताच कोलकाता शहरात पार पडला. ३०० हून अधिक खेळाडूंवर बोली लावण्यात आली. गतविजेत्या मुंबई इंडियन्स संघाने यंदाच्या हंगामाकरता सावध पवित्रा आजमावत, ६ खेळाडूंना संघात दाखल करुन घेतलं. पहिल्याच प्रयत्नात ऑस्ट्रेलियाच्या ख्रिस लिनवर मुंबईने २ कोटींची बोली लावली आणि लिलावाचा श्रीगणेशा केला.

अवश्य वाचा – IPL 2020 : ….आता बुमराहविरोधात खेळावं लागणार नाही, ख्रिस लिनची प्रतिक्रीया

सुदैवाने यादरम्यान कोणत्याही इतर संघाने लिनला संघात घेण्यात स्वारस्य दाखवलं नाही…त्यामुळे लिन मुंबईच्या ताफ्यात दाखल झाला. यानंतर लिनने आपल्या ट्विटर अकाऊंटवर या निवडीबद्दल आनंद व्यक्त करत, जसप्रीत बुमराहची फिरकी घेणारं एक ट्विट टाकलं.

जसप्रीत बुमराहने आपल्या नेहमीच्या शैलीत ख्रिस लिनला तंबी देत, सरावादरम्यान तुझी माझ्याशी गाठ असल्याचं उत्तर दिलं.

सध्या जागतिक क्रमवारीत पहिल्या स्थानावर असलेल्या पॅट कमिन्सवर कोलकाता संघाने १५ कोटी ५० लाखांची बोली लावली. कमिन्स यंदाच्या हंगामाचा आणि आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

अवश्य वाचा – IPL 2020 Auction : सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्सची प्रतिक्रिया, म्हणाला…