आयपीएल २०२१च्या अंतिम फेरीत चेन्नईने कोलकाताला २७ धावांनी हरवून चौथ्यांदा जेतेपद पटकावले. फाफ डु प्लेसिसला सामनावीराचा किताब देण्यात आला. फाफने ८६ धावांची शानदार खेळी खेळली. अंतिम सामन्यादरम्यान, धोनीने कोलकात्याचा फलंदाज राहुल त्रिपाठीला त्याच्या योगदानासाठी पाठीवर कौतुकाची थाप दिली. या घटनेचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

नक्की झाले काय?

राहुल त्रिपाठी अंतिम सामन्यादरम्यान दुखापतग्रस्त झाला होता. सीएसकेच्या डावाच्या सातव्या षटकात, त्याला पायाला दुखापत झाली, ज्यामुळे फिजिओ मैदानावर आला आणि त्याला मैदानाबाहेर नेले. याशिवाय केकेआरच्या फलंदाजीच्या वेळी राहुल त्याच्या नियमिक स्थानी फलंदाजीला येऊ शकला नाही.

हेही वाचा – ‘कॅप्टन कूल’ महेंद्रसिंह धोनी दुसऱ्यांदा होणार बाबा!

अशा परिस्थितीत जेव्हा केकेआरच्या ७ विकेट पडल्या, तेव्हा त्रिपाठीने धैर्य दाखवले आणि तो फलंदाजीला आला. पायाला दुखापत होती, तरीही त्याने अंतिम सामन्यात धैर्य दाखवले. मात्र तो स्वस्तात माघारी परतला. यावेळी धोनीने त्याच्या धैर्याचे कौतुक करत पाठीवर थाप दिली. या कृतीमुळे धोनीचे सर्वत्र कौतुक होत आहे.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

चेन्नईने चौथ्यांदा आयपीएलचे जेतेपद पटकावले. २०१०, २०११, २०१८ आणि २०२१ मध्ये चेन्नईचा संघ आयपीएल विजेता ठरला. दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात चेन्नईने नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना तीन गडी बाद १९२ धावांची मजबूत धावसंख्या उभारली आणि नंतर त्यांच्या गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे कोलकाताला ९ बाद १६५ धावांपर्यंत रोखले.