आयपीएल २०२१मध्ये गुणतालिकेत तळाशी असणाऱ्या सनरायझर्स हैदराबादचा सामना पंजाब किंग्जशी होत आहे. यात पंजाबने खराब फलंदाजीचे प्रदर्शन करत हैदराबादच्या गोलंदाजांसमोर गुडघे टेकले. हैदराबादने गोलंदाजीसोबत क्षेत्ररक्षणातही कमाल केली. सामन्यादरम्यान हैदराबादचा खेळाडू जगदीश सूचितने एक जबरदस्त झेल टिपत सर्वांना थक्क केले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सूचितने पंजाबचा स्फोटक खेळाडू दीपक हुडाचा अप्रतिम झेल टिपला. वेगवान गोलंदाज जेसन होल्डर १६वे षटक टाकत होता. या षटकाच्या चौथ्या चेंडूवर दीपकने कव्हरच्या वरून मोठा फटका खेळला, पण त्याआधीच बदली खेळाडू म्हणून मैदानात आलेल्या सूचितने आपल्या डाव्या बाजूला सूर मारत एकहाती झेल टिपला. हुडाने १३ धावा केल्या.

हेही वाचा – “पाकिस्तानची चांगली रणनीती स्वीकारून भारतानं आपली चांगली टीम तयार केलीय”

शारजाहच्या मैदानावर पंजाब किंग्ज आणि सनरायझर्स हैदराबाद यांच्यात सामना सुरू आहे. हे मैदान मोठ्या धावसंख्येसाठी ओळखले जाते. पण हैदराबादच्या गोलंदाजांनी केलेल्या तिखट माऱ्यासमोर पंजाबला २० षटकात ७ बाद १२५ धावा करता आल्या. सनरायझर्स हैदराबादचा कर्णधार केन विल्यमसनने नाणेफेक जिंकून पंजाबला प्रथम फलंदाजीचे आमंत्रण दिले. हैदराबादचा वेगवान गोलंदाज जेसन होल्डरने मयंक अग्रवाल आणि केएल राहुलला स्वस्तात बाद केले. त्यानंतर पंजाबच्या डावाला उतरती कळा लागली.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2021 srh vs pbks sustitute player jagadeesha suchith takes stuuner to dismiss deepak hooda adn
First published on: 25-09-2021 at 21:50 IST