इंडियन प्रिमियर लीगच्या प्रशासकीय समितीने मंगळवारी टाटा कंपनीचं नाव आयपीएलचे अधिकृत प्रायोजक म्हणजेच मेन स्पॉन्सर म्हणून निश्चित केलं. त्यामुळेच चिनी स्मार्टफोन निर्माती कंपनी असणाऱ्या विवोऐवजी या वर्षीपासून टाटा हे आयपीएलचे प्रायोजक असतील. मात्र विवोचा दोन वर्षांचा करार शिल्ल असताना अचानक टाटा कंपनीला टायटल स्पॉन्सर का बनवण्यात आलं यासंदर्भातील पडद्यामागील घडामोडी समोर आल्यात.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

एएनआयने सुत्रांच्या हवाल्याने दिलेल्या माहितीनुसार आयपीएलच्या समितीने टाटांना मुख्य प्रायोजक म्हणून निवडण्यामागे विवोने घेतलेला एक निर्णय कारणीभूत ठरला. विवोने २०१८ मध्ये वार्षाला ४४० कोटी रुपये खर्च करुन टायटल स्पॉनर्सचे हक्क २०२४ पर्यंत विकत घेतले होते. मात्र कंपनीने अचानक माघार घेतली आहे. “आम्ही टाटांकडे मुख्य प्रायोजक म्हणून पाहत आहोत. विवोला त्यांचा करार रद्द करायचा आहे. या कराराचे दोन वर्ष अद्यापही बाकी आहेत. त्यामुळेच या दोन वर्षांच्या कालावधीसाठी टाटा हेच मुख्य प्रायोजक असतील,” अशी माहिती या घडामोडींशी संबंधित अधिकाऱ्यांनी दिली.

नक्की पाहा हे फोटो >> Birthday Special: …अन् द्रविडने Fu** हा आक्षेपार्ह शब्द असणारं T-shirt घालून फिरणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूला झापलं

नव्याने प्रायोजक शोधण्यासाठी दोन वर्षांनी पुन्हा प्रयत्न केले जाणार आहेत. मात्र तोपर्यंत टाटा हेच आयपीएलचे मुख्य प्रायोजक असतील असं आयपीएल समितीने म्हटलंय.

लीगसोबतच्या प्रायोजकत्व करारासाठी विवोकडे काही वर्षे शिल्लक असतानाच कंपनीने करारामधून माघार घेण्याचं ठरवलं आहे. त्यामुळे या लीगचे नाव आता ‘टाटा आयपीएल’ असेल. चिनी स्मार्टफोन निर्मात्यांनी २०२० मध्ये भारत-चीन राजनैतिक वादामुळे हा करार एका वर्षासाठी थांबवला होता. त्यावेळी हे अधिकार ड्रीम इलेव्हनला हस्तांतरित केले गेले. मात्र आता आयपीएलच्या समितीने टाटांना प्राधान्य देत त्यांच्या नावाची मुख्य प्रायोजक म्हणून घोषणा केलीय.

मराठीतील सर्व क्रीडा बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Ipl 2022 here is why bcci selects tata over vivo as title sponsor scsg
First published on: 11-01-2022 at 15:31 IST