आयपीएलमधील राजस्थान रॉयल्स संघ आणि कर्णधार संजू सॅमसन यांच्यात सर्वकाही अलबेल नसल्याचं समोर आलं आहे. संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स संघ सोडणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. विकेटकिपर फलंदाज संजू सॅमसनचं काही तरी बिनसल्याचं बोललं जात आहे. सोशल मीडियावर अधिकृत असलेलं राजस्थान रॉयल्स संघाचं खातं संजू सॅमसननं अनफॉलो केल्याचं बोललं जात आहे. मात्र फ्रेंचाईसी आणि संजू सॅमसन या दोघांनी याबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. संजू सॅमसननं राजस्थान रॉयल्सचं सोशल मीडिया खातं का अनफॉलो केलं?, याबाबत संघाला माहिती नसल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे.

दुसरीकडे, फ्रेंचाईसीने संजू सॅमसनला पुढच्या सत्रासाठी प्राथमिकता दिली होती. मात्र संजू सॅमसन राजस्थान रॉयल्स खेळण्यास इच्छुक नसल्याचं सांगण्यात येत आहे. संजू सॅमसन आयपीएल २०२२ मध्ये चेन्नई सुपर किंग्समध्ये सहभागी होण्याची शक्यता आहे. कारण सॅमसननं चेन्नई सुपर किंग्सला सोशल मीडियावर फॉलो केलं आहे. सॅमसन चेन्नईसाठी धोनीचा पर्याय ठरू शकतो.

न्यूझीलंडविरुद्धच्या टी २० मालिकेसाठी टीम इंडियाची घोषणा; रोहित शर्माकडे कर्णधारपद, तर विराट कोहलीला आराम

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

आयपीएल २०२१ मध्ये संजू सॅमसनची बॅट चांगलीच तळपली होती. १४ सामन्यात संजू सॅमसननं ४८४ धावा केल्या. यात एक शतक आणि दोन अर्धशतकांचा समावेश आहे. संजू सॅमसननं या पर्वात एकूण ४५ चौकार आणि १७ षटकार ठोकले होते.