नवी दिल्ली : लय मिळवण्यासाठी झगडणाऱ्या दिल्ली कॅपिटल्स संघासमोर कामगिरी उंचावण्याचे आव्हान असून इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) ट्वेन्टी-२० क्रिकेटमध्ये आज, बुधवारी होणाऱ्या सामन्यात त्यांची गुजरात टायटन्सशी गाठ पडणार आहे. या लढतीत कर्णधार म्हणून ऋषभ पंतच्या कामगिरीकडे सर्वांचे लक्ष असेल.

दिल्ली आणि गुजरात या दोन्ही संघांना यंदाच्या हंगामात कामगिरीत सातत्य राखता आलेले नाही. दिल्लीला आठपैकी तीन, तर गुजरातला चार सामनेच जिंकता आले आहेत. गेल्या सामन्यात घरच्या मैदानावर दिल्लीला सनरायजर्स हैदराबादकडून मोठा पराभव पत्करावा लागला. या सामन्यात हैदराबादने २० षटकांत २६६ धावांचा डोंगर उभारला आणि दिल्लीचा संघ १९९ धावांत गारद झाला. दिल्लीचा हा हंगामातील पाचवा पराभव होता.

दुसरीकडे, गुजरातच्या संघाचाही कामगिरीत सातत्य आणण्याचा प्रयत्न असेल. आठ गुणांसह ते सहाव्या स्थानी आहेत.

● वेळ : सायं. ७.३० वा.

● थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्स १, १ हिंदी, जिओ सिनेमा अॅप