इंडियन प्रीमियर लीगचा (आयपीएल) लिलाव हा स्पर्धेइतकाच रोमांचक आहे, असे म्हटल्यास चुकीचे ठरणार नाही. गेल्या काही वर्षांत, लिलावाने क्रिकेटच्या खेळाला काही अत्यंत रोमांचकारी आणि सुंदर गोष्टी दिल्या आहेत. कोट्यधीश बनलेल्या अनोळखी चेहऱ्यांपासून ते न विकल्या जाणार्‍या मोठ्या नावांपर्यंत, गेल्या आयपीएल १५ लिलावात हे सर्व दिसून आले आहे.

दरम्यान, आयपीएलच्या १६ व्या मोसमासाठी बेंगळुरूमध्ये लिलाव सुरू आहे. या अगोदर एखाद्या खेळाडूची सेवा घेण्यासाठी मुंबई इंडियन्सने पहिल्यांदा लिलावात १० कोटींहून अधिक खर्च केल्याने, या लिलावात इतिहास घडवला. पाच वेळच्या चॅम्पियनने इशान किशनची सेवा पुन्हा घेण्यासाठी १५.२५ कोटी रुपये खर्च केले होते. या वर्षीच्या मेगा लिलावात पर्यंत यष्टीरक्षक-फलंदाज सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

cricketer ashish nehra fast bowler used to use nokia phone in smartphone world
ऑड मॅन आऊट! स्मार्टफोनच्या काळात नेहरा वापरायचा बाबा आझमच्या काळातला नोकिया फोन, २०१७ मध्ये उघडले होते व्हॉट्सअप
Irfan Pathan Picks 15 Man Squad
Team India : इरफान पठाणने टी-२० विश्वचषकासाठी १५ खेळाडूंची केली निवड, हार्दिक पंड्यासमोर ठेवली ‘ही’ अट
Glenn Maxwell makes bizarre comment on Virat Kohli
T20 World Cup : ‘मला आशा आहे की विराट कोहलीची निवड होणार नाही’, आरसीबीच्या ‘या’ खेळाडूचे चकित करणारे वक्तव्य
Along with Wanderers Kingsmead Newlands will host 2027 World Cup matches sport news
वॉण्डरर्ससह किंग्जमीड, न्यूलॅण्ड्सला २०२७च्या विश्वचषकाचे सामने

आयपीएल इतिहासातील सर्वात महागडे खेळाडू (हंगामानुसार):

पहिल्या लिलावात, एमएस धोनी हा सर्वात महागडा खेळाडू ठरला होता. त्यामुळे कोणाच्या भुवया उंचावल्या नाहीत. २००७ च्या टी-२० विश्वचषकात भारताच्या विजयानंतर आणि एक फलंदाज आणि कर्णधार म्हणून धोनीच्या क्षमतेमुळे, तो लिलावात सर्वाधिक मागणी असलेला खेळाडू होता. चेन्नई सुपर किंग्सने त्याची सेवा ९.५ कोटी रुपयांना घेतली. तेव्हापासून, तो चेन्नई-आधारित संघासोबत आहे आणि त्यांना तीनदा आयपीएल विजेतेपद मिळवून दिले आहे.

त्यानंतर पुढील वर्षी, शेन बाँड आणि किरॉन पोलार्ड यांनी आयपीएल २०१० च्या आधी हा मान मिळवण्याआधी दोन इंग्लंडचे खेळाडू – केविन पीटरसन आणि अँड्र्यू फ्लिंटॉफ – सर्वात महागडे खेळाडू बनले. २०११ च्या हंगामासाठी, कोलकाता नाइट रायडर्सने गौतम गंभीरला सर्वात महागडा खेळाडू म्हणून करारबद्ध केले. त्याच्यासाठी तब्बल १४.९ कोटी रुपये मोजले होते.

हेही वाचा – IPL 2023 Auction: मोठी बोली लागूनही खेळाडूला का मिळत नाहीत पूर्ण पैसे; जाणून घ्या काय आहे टायब्रेकरचा नियम?

त्यानंतरच्या हंगामात युवराज सिंग (दोनदा), बेन स्टोक्स (दोनदा), रवींद्र जडेजा, जयदेव उनाडकट यांसारखे खेळाडू सर्वात महागडे खेळाडू ठरले. गेल्या मोसमात पॅट कमिन्स हा आयपीएल इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला होता.

दरम्यान, २०२१ चा आयपीएल लिलाव सर्वात रोमांचक ठरला. ज्यामध्ये ख्रिस मॉरिसला १६.२५ कोटी रुपये मिळाले होते. ही रक्कम राजस्थान रॉयल्सने त्याच्यासाठी मोठी रक्कम खर्च केली होती. लिलावात तो सर्वात महागडा खेळाडूही ठरला. वर नमूद केल्याप्रमाणे, इशान किशनने या वर्षीच्या इव्हेंटमध्ये मोठ्या रकमेची कमाई केली. कारण त्याने मुंबई इंडियन्सकडून १५.२५ कोटी रुपये मिळवले.

हेही वाचा – IPL 2023: मिनी लिलावापूर्वी बीसीसीआयने दिली आनंदाची बातमी; ‘या’ दोन देशांचे खेळाडू खेळणार संपूर्ण हंगाम

तसेच आज आयपीएल २०२३ साठी, २३ डिसेंबर (शुक्रवार) रोजी कोची येथे खेळाडूंचा मिनी लिलाव होणार आहे. सर्व १० फ्रँचायझी संघांसोबतच चाहते आणि क्रिकेटपटूही आयपीएलच्या या मिनी लिलावाची आतुरतेने वाट पाहत आहेत. या लिलाव प्रक्रियेला दुपारी २:३० वाजेपासून सुरुवात होणार आहे.