IPL Auction Date Announced: आयपीएल गव्हर्निंग काऊन्सिलने इंडियन प्रीमियर लीगच्या १८व्या हंगामापूर्वी आयपीएलच्या मेगा लिलावाच्या तारखांची अधिकृत घोषणा केली आहे. यावेळी खेळाडूंचा लिलाव २४ आणि २५ नोव्हेंबर रोजी होणार आहे. सौदी अरेबियामध्ये जेद्दा शहरात हा मेगा लिलाव होणार आहे. ३१ ऑक्टोबर रोजी, सर्व १० आयपीएल फ्रँचायझींनी त्यांच्या कायम ठेवलेल्या खेळाडूंच्या नावांची घोषणा केली होती, त्यामुळे यंदाच्या लिलावात अनेक मोठी नावे यावेळी लिलावाचा भाग असतील. यामध्ये सर्व संघांसह एकूण २०४ खेळाडूंच्या जागा रिक्त आहेत.

आयपीएलचा आगामी मेगा लिलाव खूपच रोमांचक होणार आहे, ज्यामध्ये ऋषभ पंत, केएल राहुल आणि श्रेयस अय्यर सारखे अनेक मोठे खेळाडू उतरणार आहेत, त्यामुळे त्यांच्यासाठी मोठ्या बोली लावल्या जातील हे निश्चित आहे. यावेळी सर्व १० फ्रँचायझींनी मिळून एकूण ४६ खेळाडूंना रिटेन केले आहे, ज्यांची नावे ३१ ऑक्टोबर रोजी जाहीर करण्यात आली होती.

हेही वाचा – IPL 2025 Retention: रिटेंशननंतर कोणत्या संघाकडे किती रक्कम शिल्लक? या संघाच्या खात्यात तर तब्बल ११० कोटी

२४ आणि २५ नोव्हेंबरला आयपीएल मेगा लिलाव आयोजित केला जात आहे, त्या दरम्यान भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर पर्थमध्ये पहिला कसोटी सामना खेळणार आहे आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिवसाचा खेळ खेळवला जात असताना हा लिलाव होणार आहे. याआधी २०२४ मध्ये दुबईत आयपीएलचा मिनी लिलाव झाला होता.

४ नोव्हेंबर २०२४ रोजी IPL खेळाडूंची लिलावासाठीची नोंदणी अधिकृतपणे बंद झाली. एकूण १५७४ खेळाडूंनी (१,१६५ भारतीय आणि ४०९ विदेशी) मेगा TATA IPL 2025 लिलावामध्ये सहभागी झाले आहेत. या खेळाडूंमध्ये ३२० कॅप्ड खेळाडू आहेत, १२२४ अनकॅप्ड खेळाडू तर ३० खेळाडू हे असोसिएट देशांचे आहेत.

हेही वाचा – Rohit Sharma: “मी निवृत्ती घेतल्यानंतर या क्रमांकावर…”, रोहित शर्माने सूर्या-हार्दिकपेक्षा कमी रिटेंशन किंमत मिळाल्यानंतर केले मोठे वक्तव्य, पाहा VIDEO

खेळाडूंची यादी

भारतीय कॅप्ड खेळाडू – ४८
विदेशी कॅप्ड खेळाडू – २७२
आयपीएलचा पूर्वीही भाग असलेले अनकॅप्ड भारतीय खेळाडू – १५२
आयपीएलचा पूर्वीही भाग असलेले अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू – ३
अनकॅप्ड भारतीय खेळाडू – ९६५
अनकॅप्ड आंतरराष्ट्रीय खेळाडू – १०४

हेही वाचा – Kolkata Knight Riders : केकेआरला लिलावापूर्वी बसला मोठा फटका, तिजोरीतून वजा होणार १२ कोटी रुपये, नेमकं काय आहे कारण?

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

भारत सोडून कोणत्या संघाचे सर्वात जास्त खेळाडू आयपीएल लिलावात उतरणार

अफगाणिस्तान – २९ खेळाडू
ऑस्ट्रेलिया – ७६ खेळाडू
बांगलादेश – १३ खेळाडू
कॅनडा – ४ खेळाडू
इंग्लंड – ५२ खेळाडू
आयर्लंड – ९ खेळाडू
इटली – १ खेळाडू
नेदरलँड्स – १२ खेळाडू
स्कॉटलंड – २ खेळाडू
दक्षिण आफ्रिका – ९१ खेळाडू
श्रीलंका – २९ खेळाडू
युएई- १ खेळाडू
अमेरिका – १० खेळाडू
वेस्ट इंडिज – ३३ खेळाडू
झिम्बाब्वे – ८ खेळाडू