आयपीएलच्या तेराव्या हंगामाचा लिलाव कोलकाता नाईट रायडर्स संघाने खऱ्या अर्थाने गाजवला. ऑस्ट्रेलियाचा जलदगती गोलंदाज पॅट कमिन्ससाठी १५ कोटी ५० लाखांची बोली कोलाकाता संघाने मोजली. आयपीएलच्या इतिहासात कमिन्स सर्वात महागडा परदेशी खेळाडू ठरला आहे. याव्यतिरीक्त इयॉन मॉर्गन, टॉम बॅन्टन, राहुल त्रिपाठी यांसारखे फलंदाजांवरही बोली लावत कोलकात्याने पेपरावर आपला मजबूत संघ तयार केला आहे.

जाणून घेऊयात कोलकाता नाईट रायडर्सचा संपूर्ण संघ…

फलंदाज – नितीश राणा, रिंकु सिंह, शुभमन गिल, सिद्धेश लाड, इयॉन मॉर्गन (५ कोटी २५ लाख), टॉम बॅन्टन (१ कोटी), राहुल त्रिपाठी (६० लाख)

गोलंदाज – हॅरी गुर्ने, प्रसिध कृष्णा, संदीप वारियर, कुलदीप यादव, शिवम मवी, कमलेश नागरकोटी, लॉकी फर्ग्युसन, वरुण चक्रवर्ती (४ कोटी), एम. सिद्धार्थ (२० लाख), प्रवीण तांबे (२० लाख)

अवश्य वाचा – IPL 2020 : कोलकात्याची कमान दिनेश कार्तिकच्याच हातात, प्रशिक्षकांनी केली घोषणा

अष्टपैलू – आंद्रे रसेल, सुनील नरीन, पॅट कमिन्स (१५ कोटी ५० लाख), ख्रिस ग्रीन (२० लाख)

यष्टीरक्षक – दिनेश कार्तिक, निखील नाईक (२० लाख)

अवश्य वाचा – IPL 2020 Auction : सर्वात महागडा खेळाडू ठरलेल्या पॅट कमिन्सची प्रतिक्रिया, म्हणाला…

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दरम्यान, पहिल्या टप्प्यात बोली लागलेल्यांमध्ये ऑस्ट्रेलियाचे खेळाडू मालामाल झाले. पॅट कमिन्स आणि ग्लेन मॅक्सवेल या दोघांना १० कोटींहून अधिकची बोली लागली. लिलावाच्या दुसऱ्या टप्प्यात अनेक खेळाडू UNSOLD राहिले. कागदावर महत्त्वाच्या वाटणाऱ्या काही खेळाडूंवर कोणीही बोली लावली नाही. आश्चर्याची बाब म्हणजे फिरकीपटू पियुष चावलाला अनपेक्षित बोली लागली. त्याला चेन्नईच्या संघाने विकत घेतले. तिसऱ्या टप्प्यात भारतीय युवा खेळाडूंचा भरणा असला, तरी त्यांच्यावर बोली लावण्यात संघांनी फारसा रस दाखवला नाही. चौथ्या टप्प्यात धक्कादायकरित्या अनेक मोठ्या आणि नावाजलेल्या खेळाडूंना कोणीही वाली मिळाला नाही. मार्टिन गप्टिल, कार्लोस ब्रेथवेट, मुस्तफिजूर रहमान, बेन कटिंग यासारख्या अनेक खेळाडूंना खरेदी करण्यात कोणत्याही संघमालकाने रस दाखवला नाही. तर शेवटच्या टप्प्यात ताज्या यादीतील काही खेळाडूंसह पहिल्या फेरीत UNSOLD राहिलेल्या खेळाडूंनाही पुन्हा लिलावासाठी ठेवण्यात आले. त्यात काही खेळाडूंवर बोली लावण्यात आली.

अवश्य वाचा – IPL 2020 : जाणून घ्या लिलावानंतर राजस्थान रॉयल्सचा संपूर्ण संघ